Home विदर्भ जन्मभूमितील डॉक्टरांकरिता महेश ने घेतली धाव अनेक डॉक्टरांना महेश किसान सेफ्टी किटचे...

जन्मभूमितील डॉक्टरांकरिता महेश ने घेतली धाव अनेक डॉक्टरांना महेश किसान सेफ्टी किटचे वितरण

115

अकोट प्रतिनिधी:-देवानद खिरकर

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र पी.पी.ई. किटचा तुटवडा असल्याने डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. बरेच डॉक्टर पैसे देऊन पी.पी.ई. किट घ्यायला तयार असल्यावरही किट उपलब्ध होत नाहीत. हिवरखेड येथील डॉक्टरांनाही किटची समस्या भेडसावत होती.
दुसरीकडे हिवरखेड येथील भूमिपुत्र महेश कमलकिशोरजी बजाज हे अकोल्यात असून त्यांनी महेश एंटरप्राइजेस अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणीच्या विषबाधे पासून वाचण्याकरिता अतिशय चांगल्या प्रतीच्या महेश किसान सेफ्टी किट ची निर्मिती केलेली आहे. अकोला येथे शासकीय आणि खाजगी डॉक्टरांकरिता त्यांनी या किटचे निशुल्क वाटप केलेले आहे. तसेच अकोला येथील जैन भोजनालयचे संचालक ईश्‍वर जैन आणि महेश बजाज हे अनेक दिवसांपासून दररोज 500 गरजु व्यक्तींकरिता अविरत भोजन तसेच मिनरल वाटर चे वितरण करीत आहेत. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी महेश बजाज यांच्याशी चर्चा करून हिवरखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून डॉक्टरांसाठी महेश सेफ्टी किटची विनंती केली. महेश बजाज यांनी तात्काळ प्रतिसाद देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आरोग्यवर्धिनी केंद्र हिवरखेड येथे डॉ. नंदकिशोर चव्हाण, डॉ. मंगेश राहाटे, डॉक्टर वैशाली ठाकरे, डॉक्टर मुरलीधर अग्रवाल, डॉ मनोहर गावंडे, डॉ दीपक गावंडे, संगीता देवकर, आसिफ सौदागर, राजू खारोडे, यांना महेश किसान सेफ्टी किट भेट दिल्या. सदर उपक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून संदीप इंगळे, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, सूरज चौबे, जितेश कारिया, राहुल गिर्हे, अनिल कवळकार, जावेद खान, उमर बेग, धिरज बजाज इत्यादी पत्रकार बांधवांच्या पुढाकारातून संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच सुरेश ओंकारे, ग्रामविकास अधिकारी भिमराव गरकल, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, रवींद्र वाकोडे, प्रकाश राऊत, पंकज इंगळे, राजू बांते, संदीप ढगे ईखार साहेब, आमले साहेब, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सची विशेष खबरदारी घेण्यात आली.
महेश बजाज आणि ईश्वर जैन यांच्या सामाजिक कार्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड तर्फे आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आणि निवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश राऊत यांच्या तर्फे निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे ठाणेदार आणि इतरांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महेश सेफ्टी किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती सुद्धा महेश बजाज यांनी दिली.