Home बुलडाणा देवालयाने नाकारलेल्या भुकेलेल्यांना फोटोग्राफरने भरविला माणूसकीचा घास ????

देवालयाने नाकारलेल्या भुकेलेल्यांना फोटोग्राफरने भरविला माणूसकीचा घास ????

62
0

अमीन शाह

बुलडाणा

साखरखेर्डा बसस्थानकावरून मार्गक्रमण करीत असताना आज कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जालन्यावरुन गोंदिया जाणारे काही कामगार रस्ता चुकुन अचानक सायंकाळी साखरखेर्डा बसस्थानकावर धडकले. बसस्थानकावर संध्याकाळची वेळ सगळं सामसूम… डियुटीवर असलेल्या पोलीसांना त्यांनी पाणी मागितले. पोलिसांनी लागलीच पाण्याची सोय केली पण त्यांची चौकशी केली असता त्यांना टाळेबंदीमुळे अडकून पडल्याने अत्यल्प दरात सायकल विक्रेत्याने सायकल दिल्याची माहिती देत भाकरीविना व्याकूळ झालेल्या भावना त्यांनी व्यक्त करताना पोलीसांचीही डोळे डबडबली. हा प्रसंग याची डोळ्याने ऐवजी बघितल्यावर पोलीसांनी त्यांना पोलीस मदत केंद्रात रात्रभर थांबण्याची सुचना केली. अन्न पाण्यासाठी त्रस्त झालेल्या या समृध्दी कामगारांना अन्नछत्र उपलब्ध करून देण्याची संतांची पावनभूमि ओळखल्या जाणाऱ्या प. पू. सद्गुरु प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानच्या व्यवस्थापकांना प्रथम विनंती केली त्यांनी मंदिर बंद असल्याने आम्ही काही मदत करू शकत नसल्याचे सांगितले तद्नंतर पलसिध्द महास्वामींच्या मठात संपर्क साधला असता तेथे थोडी माणूसकी दाखवल्या गेली पण मठात जेवन तयार करण्यासाठी कोणीतरी घेऊन या अन्नधान्य उपलब्ध आहे असे निळकंठ स्वामी यांनी सांगितले. मात्र वेळेवर काहीच पर्याय नसल्याने लागलीच फोटो ग्राफर सोमेश्वर इंगळे यांनी आपल्या घरून अवघ्या विस मिनीटात दहा पंधरा जणांने भोजन तयार करून त्यांचा पोलीस चौकीत भूकेचा आगडोंब शमविला. मात्र याक्षणी संत गजानन महाराज संस्थानाची आठवण मनात दाटून आली. तसा देव एकच अन माणूस हाच खरा देव. हेच ब्रीद किर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून भाविकांमध्ये रूजविण्याचे हे धर्मस्थळे अनेक वर्षांपासून काम करत आहेत. करोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याने संत गजानन महाराज संस्थान देखील बंद आहे. मात्र माणूसकी जपत विविध ठिकाणी कोरोनाच्या टाळेबंदीचा परिणाम बघता प्रामुख्याने स्थलांतरित दिशेने पायदळी गांव गाठणाऱ्या तर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना त्या त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहे.त्याच मार्गाचा अवलंब केल्यास संतांची पावनभूमि असलेल्या तिर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील देवस्थानांनी संत गजानन महाराज संस्थानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास खर्या अर्थाने ही संतांची पावनभूमि आहे असे म्हणता येईल.
हजारो लोकांना एका पंक्तीत पंचपक्वान्नाचे ताठ वाढणारी ही भूमी, ईमल्यावर इमले चढवून जर संकटकाळात अडल्या नडल्यांना चटणीभाकरीची माणूसकी दाखवत नसेल तर सोनेरी मुकूटाचा काय उपयोग?
आज देशभरात मंदिर, मशिदी बंद आहेत. कोरोनाच्या टाळेबंदीत उपरोक्त संस्थाने बंद आहेत याबद्दल दुमत नाही पण दरवर्षी लाखो रूपयांच्या देणग्या पदरात पडणार्‍या या देवस्थानांनी मंदिराबाहेर संकटकाळात जेवणाची कोठेही सुचना वजा पाटी लावलेली नाही. ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. पुजारी, व्यवस्थापक जे माणसाला जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महंत आहेत. त्यांनीच स्वतःला कोंडून तर घेतलेच आहे याबद्दल काही म्हणायचे नाही कारण त्यांची आज समाजाला गरज आहे, आणि घराबाहेर न पडण्याच्या सुचना आहेत. पण एखादा जागृत वर्ग, त्यांचे अनुयायी देखील कोरोनाच्या टाळेबंदीत रस्त्याने जाताना कुणी उपाशी चाललाय काय?याचे काही सोयरसुतक नाही. ही माणूसकी ला लावणारी गोष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही.
असो शेवटी संतांच्या पावनभूमितला सोमेश्वर इंगळे सारखा एक भक्त तरी भूकेल्यांच्या मदतीला धावून आला. हा सद्गुरु, शिवाचार्यांचींनीच दिलेली बुध्दी असे आपण माणूस फोटोग्राफर च्या माणूसकी ला सलाम करू या.
एवढे ,

शब्दांकन , संतोष गाडेकर ,

Unlimited Reseller Hosting