Home विदर्भ सा. महादल परिवारातर्फे लॉकडाऊन संपेपर्यंत कोरोना संचारबंदीत बंदोबस्तासाठी तैनात , सर्व शासकीय...

सा. महादल परिवारातर्फे लॉकडाऊन संपेपर्यंत कोरोना संचारबंदीत बंदोबस्तासाठी तैनात , सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे वाटपाला सुरुवात

57
0

कारंजा / वाशिम – कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यभरात लागु असलेल्या संचारबंदीमधे अनेक सेवाभावी संस्था आपला भरीव सहभाग नोंदवत आहेत, त्यामध्ये गरीब गरजूंना अन्नधान्य तसेच त्यांच्या दोनवेळेच्या जेवणाची व्यवस्था ते करत आहेत.

मात्र ह्यामधील महत्वाची बाब म्हणजे उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे सदर संचारबंदीमधे दिवसरात्र बंदोबस्तात तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी , नगरपालिकेचे कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी , क्रुषी विभागाचे कर्मचारी ह्यांना शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय , नेमकी हिच बाब सा.महादल चे संपादक आरिफभाई पोपटे तथा मानोरा तालुका प्रतिनिधी सलीम खान,कारंजा प्रतिनिधी विलास खपली, विशेष शहर प्रतिनिधी एकनाथ पवार यांनी हेरली व हा विषय हाताळायचे ठरविले , चर्चेअंती कारंजातील बंदोबस्तावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद थंड पिण्याच्या बॉटलचे वाटप करण्याचे ठरविले त्याची सुरुवात आज दि.१३/०४/२० रोजी स्थानिक जयस्तंभ चौकातून करण्यात आली. कारंजा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गोपाल पाटील भोयर , सा. महादलचे संपादक आरिफभाई पोपटे , तसेच नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा दिव्य मराठी चे प्रतिनिधी फिरोजभाई शेकुवाले यांच्या हस्ते नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विनय वानखडे तसेच इतर कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या थंड बॉटलचे वितरण करण्यात आले ह्या प्रसंगी गोपाल पाटील व आरिफभाई यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सदर लॉकडाऊन संपल्यानंतर कर्तव्यावरील सर्व कर्मचाऱ्यांप्रती क्रुतज्ञता सोहळा कारंजा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करणार असल्याचे सांगितले. उद्या दिनांक १४ एप्रिल रोजी सदर पिण्याच्या बाटलीबंद बॉटलचे वाटप भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयुष्मान सागर अंभोरे हे करतील.ह्याप्रसंगी सागर अंभोरे,सलीम खान,विलास खपली, एकनाथ पवार, छगन वाघमारे, रवि रोडे,हरदिप पिंजरकर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.