मराठवाडा

“लोकडाऊनमध्ये” क्रांतीसूर्याच्या ऑनलाईन कविसंमेलनात सत्यशोधकी विचारांचा जागर..

Advertisements
Advertisements

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १४ :- “कित्येक वर्ष उलटले तुला जाऊन , कित्येक हंगाम सरलेत..
इथल्या माणसाच्या गर्दीत तुझी वाट पाहून..
कित्येक माणसे आली, गेलीत, संपलित..
काळाच्या ओघात !
काही छापल्या गेलित मोठ्या गलतीनं,
इथल्या चलनी नोटावर..
काही उरलीत नेमकी मोजण्या इतकी बोटावर..
तू मात्र कायमच आहे आमच्या अनंत ओठावर..!”
करंटा कवी नामदेव…बोलला एव्हढा परफेक्ट महानायक कुठल्याच पुस्तकात आढळला नाही….
ही
‘परफेक्ट महानायक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ कविता सादर करून ऑनलाइन कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. नंदू वानखडे (वाशिम) यांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त “क्रांतीसूर्य” व्हाट्सअॅप समूहाने ‘लॉकडाऊनमुळे’ ऑनलाइन कविसंमेलन घेण्यात आले.
सुजाता पोपलवार (नांदेड), अर्चना खोबरागडे (यवतमाळ), संध्या रायठक (नांदेड), अरुण विघ्णे (आर्वी), रमेश बुरबुरे (यवतमाळ), प्रशांत ढोले (वर्धा), चंद्रकांत कदम (नांदेड) अभि.मनीष गवई (अमरावती) हे कवी – कवयित्री ऑनलाईन उपस्थित होते.
प्रारंभी महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी अभिवादन गीत गायले. स्तंभलेखक उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक व क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी आभार मानले. रुपेश मुनेश्वर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

“आज आपण अत्यंत संक्रमण काळात
वाटचाल करत आहोत..
शत्रु हळूहळू वेढा घालतोय आपल्याला..
मोक्याच्या व मानाच्या जागा, कधीच काबीज केल्या त्यांनी..
लोकशाहीचे सारेच स्तंभ पोखरलेत,
आपण मात्र गाफील बेसावध..!”
ही रचना सादर करून भारत लढे यांनी उद्घाटन केले.

कवियत्री सुजाता पोपलवार (नांदेड) यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर
“हे क्रांतीसुर्या,
जीर्ण झालेल्या ग्रंथाच्या पानात,
माझे अस्तित्व आता चाळू कशाला..
तुझ्या फुलांच्या वाटेवरी चालताना
काटेरी वाटेकडे आता वळू कशाला..?” ही रचना सादर केली…

फुले-आंबेडकरी चळवळ माणसानं जगली पाहिजे म्हणून रमेश बुरबुरे (यवतमाळ) या कवीने चळवळीचे नाते सांगणारी गझल सादर करून दाद मिळवली..
“खुश होता चेहरा पाहण्यासारखा,
बाप जळला तुझा कापरासारखा..
चळवळीशी निळ्या काय नाते तुझे ?
माय तू, तू तिला, वासरा सारखा..! “

कृतिशील जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यालाच शब्दबद्ध करून कवयित्री अर्चना खोबरागडे (यवतमाळ) यांनी
“बा क्रांतिबा,
तुही तोडून आणू शकला असतास,
चंद्र-तारे सावित्रीसाठी..
पण देऊन दिला विद्येचा प्रकाश, दिलं जगण्यास स्त्रियांना मुक्त आकाश..!”

ही कविता सादर केली. कवी अरूण विघ्ने (वर्धा) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या कार्याची प्रचिती देणारी रचना सादर करून टाळ्या मिळवल्या..

“माणसाला माणसाशी जोडले भिमाने,
जातीभेदाची कवाडे तोडले भिमाने..
नागभूमीत बुद्धधम्म लोकां देऊनी,
रमाईच्या वचनाला फेडले भिमाने..”

नांदेड येथील गझलकार चंद्रकांत कदम यांनी न्याय देणारी रचना सादर केली..

“प्रत्येक वाक्य माझे न्यायासमान आहे,
श्वासात भीम माझा मी संविधान आहे..
का जन्मभर करू मी हुजरेगिरी कुणाची
होऊन वाघ क्षणभर जगण्यात शान आहे..!”

वर्धा येथील कवी प्रशांत ढोले यांनी अभंग रचना सादर केली..
“शिक्षण घेऊन, जगाचे कल्याण
करावे आपण, आपलेही I
ज्ञान अनुभव, असावा पाठीशी लावू गोडी असी, शिक्षणाची I”

कवी अभियंता मनीष गवई (अमरावती) आणि कवयित्री शिक्षिका संध्या रायठक (नांदेड) यांच्याही रचना अप्रतिम होत्या.. ऑनलाइन कार्यक्रमास क्रांतीसुर्य परिवारातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते. कोरोनाच्या प्रकोपातील “लॉकडाऊन ” मध्ये घरातल्या घरात राहून संपूर्ण महाराष्ट्रातील कवींना ऑनलाईन एकत्र आणून राष्टूनायकांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केल्याबद्दल सर्वत्र आयोजकांची वाहवा होत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...