Home जळगाव सुरत व जळगाव येथून जबलपूर सतना येथे मुलांची पदयात्रा. सावदा नगरपालिका कडून...

सुरत व जळगाव येथून जबलपूर सतना येथे मुलांची पदयात्रा. सावदा नगरपालिका कडून सर्वांची वेवस्था

183

प्रदीप कुलकर्णी – सावदा

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्य सरकारने लॉक डाउन केलेले हे लॉक डाऊन 14 एप्रिल पर्यंत होते परंतु कोरोना ची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा लॉक डाऊन सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे त्यामुळे सर्व उद्योग धंदे कंपन्या ठप्प झालेले आहे, त्यामुळे तेथील मजूर आपल्या घराकडे पलायन करण्यास निघालेले आहे, अशातच सावदा येथे सुरत येथून व जळगाव येथून सुमारे 32 मुलं हे त्यांच्या घरी म्हणजेच जबलपूर सतना येथे पायी जाण्यासाठी निघाले आहे, हे सकाळी सावदा येथे आल्यानंतर सर्व थकलेल्या परिस्थितीत एका बाजारपेठेतील ओट्यावर बसलेले आढळून आले त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मालकांनी कंपनी बंद आहे आम्ही पैसे देऊ शकत नाही हे सांगितले म्हणून राहण्यासाठी व खाण्यासाठी आमच्या जवळ पैसे नाहीत म्हणून आम्ही तीन दिवसापासून पायी आमच्या घराकडे निघालो आहे, या सर्व मुलांना सावदा नगरपालिका येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी व प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी कोचुर रोडवरील नगरपालिका हॉल येथे नेऊन त्यांची राहण्याची चहा नाश्ता व जेवण्याची सोय केली, तसेच त्यांना शक्य होईल तितके दिवस इथेच राहण्याचे सुद्धा सांगण्यात येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी सावदा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांकडून करण्यात आली. त्यांची चांगल्या प्रकारे राहण्याची व जेवणाची सोय होईल याची खबरदारी नगरपरिषद कर्मचारी संदीप पाटील सचिन चोलके, विजय चौधरी, राजेंद्र मोरे यांचे मार्फत घेण्यात आली.