Home विदर्भ कुटासा येथे सोशल डीस्टन्सिंगलाच हरताळ बँकेसह प्रशासन हतबल ,

कुटासा येथे सोशल डीस्टन्सिंगलाच हरताळ बँकेसह प्रशासन हतबल ,

111

*बँक प्रशासनाने वेळोवेळी सुचना देऊन न ही येथील खातेदार ऐकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे*

*दहीहांडा पोलीस स्टेशन चे* ठाणेदार प्रेमानंद कात्रे व युवक*काँग्रेसचे प्रवक्ता कपील ढोके

*यांनी बँकेला भेट देऊन येथील नागरीकांना संचारबंदी चे नियम सांगितले*

प्रतिनिधी.. देवानंद खिरकर

कोरोना पार्श्वभूमीवर शेत कऱ्यांसह मजुरदार गरीब जनतेला दिलासा मिळावा या करिता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसह गरीब जनधन खातेदारांनी बँकेतील पैसे काढण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने सोमवारी दी.13 रोजी सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यशासनाने लॉकडाऊन सह राज्यात संचारबंदी 30 एप्रिल पर्यंत घोषित केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी शासनाने विविध अटी घालून दिलेल्या असून सुद्धा बॅकेने वेळोवेळी सुचना देऊनही येथील नागरीक संचारबंदी चे पालन करताना दिसत नाहीत शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जमा केल्याने व जन धन खात्यातील पैसे काढण्यासाठी कुटासा या गावातील नागरिक बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकच गर्दी केल्याने सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले, यामध्ये अनेकांच्या तोंडाला मास्क सुद्धा बांधलेले नसल्याचे दिसून आले बँकेला 8 ते 12 बँक चालू ठेवण्याची वेळ ठेवल्याने कुटासा सह इतर खेडेगावातील शेकडो बँक खातेदार पैसे काढण्यासाठी मोठ्या संख्येने बँकसमोर दी.13 रोजी जमले होते. सोशल डीस्टन्सिंग पाळले जावे म्हणून बॅंकेचे कर्मचारी व अधिकारी व पोलिस कर्मचारी वेळोवेळी जमलेल्या लोकांना 1 मीटर अंतर ठेवण्याच्या सूचना देत होते परंतु त्यांचे सुध्दा खातेदार ऐकत नसल्याचे दिसून आले.