Home विदर्भ सोशल डिस्टन्स ठेउन आर्वी येथे पोलिसांचा रूट मार्च.

सोशल डिस्टन्स ठेउन आर्वी येथे पोलिसांचा रूट मार्च.

37
0

महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहुन साजरी करावी

वर्धा – आर्वी तालुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी कारण नसतांना घराबाहेर पडू नये व संचार बंदीचा उल्लंघन करू नये यासाठी पोलिस निरिक्षक संपत चाैव्हान यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन पासुन पंचायत समीती, गाैरक्षण वार्ड , गांधी चाैक , गुरुनानक धर्मशाळा , आबेडकर वार्ड , पासुन रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्च मध्ये लोकांना कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी मास्क वापरावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स चा वापर करावा व महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरिच राहुन साजरी करावी असे आवाहन करण्यात आले तसेच जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याचे सांगण्यात आले. नियमांचे उलंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार संपत चाैव्हान यांनी सांगितले या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

प्रतिनिधि
रविन्द्र साखरे / ईकबाल शेख
आर्वी. वर्धा.

Unlimited Reseller Hosting