Home जळगाव जळगाव मधील पहिला करोणा पॉझिटिव्ह रुग्ण १४ दिवसानंतर निगेटिव ,

जळगाव मधील पहिला करोणा पॉझिटिव्ह रुग्ण १४ दिवसानंतर निगेटिव ,

143

जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने साजरा केला आनंदोत्सव

एजास शाह ,

जळगाव जिल्ह्याला चौदा दिवसापूर्वी मेहरून येथील एक इसम करुणा पॉझिटिव्ह आढळून आला होता व त्या पॉझिटिव रुग्णाचे रिपोर्ट सुद्धा सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते त्यामुळे अज्ञान व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा नोंदविण्यात आला होता आणि त्यामुळे जळगाव मध्ये एका विशिष्ट जाती धर्मा बद्दल वेगवेगळे वक्तव्य लोक करीत होते.
त्यातच पाच-सहा दिवसात दुसरा रुग्ण पॉझिटिव मिळून आला तोही सालार नगरमधील असल्याने त्या मुळे अधिकच भर झाली परंतु दुर्देवाने दुसऱ्या दिवशी त्या पॉझिटिव रुग्णाचे वृद्धापकाळने तसेच अनेक व्याधी असल्याने त्याचे मृत्यू झाले
त्यावेळीही दोघी पॉझिटिव्ह रुग्णाचे ३६ कुटुंबियाचे व नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते
आज १४ दिवसानंतर प्रथम पॉझिटिव मिळून आलेल्या रुग्णांचा अहवाल निगेटिव येताच व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संध्याकाळी पाच वाजता प्रेस नोट द्वारे सदर वार्ता कळवताच जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ने अल्लाचे आभार मानून जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या संपूर्ण स्टाफ चे सुद्धा आभार व्यक्त केले व बोरनार या ग्रामीण भागात जाऊन तेथील गरजवंत असलेल्या व ज्यांना अत्यंत आवश्यकता होती त्यांना रेशन व किराणा देऊन अल्लाचे आभार मानले.
यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, संचालक सलीम मोहम्मद ,हारून शेख मेहबूब, अब्दुल रउफ अब्दुल रहिम,तय्यब शेख व मोहम्मद आबिद उपस्थित होते.

फोटो कैप्शन

बोरनार येथील सामाजिक कार्यकर्ते निहाल शफी,फिरोज सईद व शकील शेख यांना किट सुपुर्द करण्यात आले