Home विदर्भ श्रावणबाळ योजनेचे तीन महिन्याचे अनुदानित पैसे त्वरित द्या – नारायण हिवरकर

श्रावणबाळ योजनेचे तीन महिन्याचे अनुदानित पैसे त्वरित द्या – नारायण हिवरकर

43
0

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर – कोरपना तालुक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी लाभार्थ्यांचे पैसे तात्काळ देण्यात यावे अन्यथा भाजप पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नियमाचे पालन करून रस्त्यावर उतरू असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कोरपना तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो कोरपना येथील श्रावण बाळ योजना अंतर्गत वृद्ध महिला वृद्ध पुरुष नागरिक हे आदिवासी दलित शोषित पीडित गोरगरीब आहे त्यांचा उदरनिर्वाह याच पैशाच्या भरोशावर आहे व मागील तिन महिन्यापासून एकही पैसा लाभार्थ्यांना मिळालेला नाही यामुळे लाभार्थी हवालदिल झाला आहे आधीच कोरोणा मुळे कोणताही रोजगार नाही पैशाची आवक नसल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारीही शासकीय नसल्यामुळे कामात हलगर्जीपणा होत आहे तरी शासकीय कर्मचारी देण्यात यावा व श्रावणबाळ अनुदान योजनेचे पैसे महीना भरात खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपाध्यक्ष नारायण हिवरकर कोरपना तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब कोरपना यांना देण्यात आले आहे.