Home महत्वाची बातमी परराज्यातून व राज्यांतर्गत बोकड वाहतूक करण्याची परवानगी द्या – शाहरुख मुलाणी

परराज्यातून व राज्यांतर्गत बोकड वाहतूक करण्याची परवानगी द्या – शाहरुख मुलाणी

234

एपीएमसी मार्केट प्रमाणे देवनार , कल्याण , वसई येथे बोकड बाजार भरवण्याची परवानगी देण्याची मागणी…!

मुंबई. (विशेष प्रतिनिधी) – परराज्यातून व राज्यांतर्गत बोकड वाहतूक करण्याची परवानगी द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, प्रथम राज्य सरकारने मटण विक्री करण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरकारचे संपूर्ण राज्यातील मटण विक्री करणाऱ्या समाजाकडून मनःपूर्वक धन्यवाद..! तसेच संपूर्ण जगभरात तसेच देशात व राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तसेच महाराष्ट्रात मुल्ला – मुलाणी, कुरेशी हे वंशावळ प्रमाणे मटण विक्री व्यवसाय करतात. त्याच बरोबर हिंदू खाटीक, घुणे, बेंद्रे, तसेच मुसलमान समाजातील शेख, कोथिंबीरे, मुजावर, आदी आडनाव असलेले लोक बोकड पालन, व्यवसाय, मटण विक्री व्यवसाय करतात. लॉकडाऊन मुळे हातावरचे पोट असलेल्या या समाजावर तसेच या समाजा अवलंबून आलेल्या काही लोकांवर उपास मारीची वेळ येण्या आधीच आपण त्यांना दुकाने उघडण्याचे आदेश देऊन सहकार्य केले. पण, राज्यात मध्यंतरी आलेल्या अस्मानी संकटामुळे बोकडांचे पालन कमी झाले. त्यामुळे आवक कमी आहे. त्यामुळे मटणाची मागणी लक्षात घेता परराज्यातून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात बोकड पालन होत असते. त्याअनुषंगाने तेथून राज्यात बोकड आणण्याची परवानगी आवश्यक आहे. तसेच एपीएमसी मार्केट प्रमाणे देवनार, कल्याण, वसई येथे बोकड बाजार भरवण्याची परवानगी देण्याची मागणी समस्त मटण विक्री करणाऱ्या समाजाकडून करण्यात आली आहे.

यावेळी मुस्ताक कुरेशी, आरिफ कोथमिरे, इसाक खडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.