Home महाराष्ट्र शिवछत्रपती साम्राज्य गृप व तहसिल कार्यालय अकोट च्या वतीने रक्तदान शिबिर

शिवछत्रपती साम्राज्य गृप व तहसिल कार्यालय अकोट च्या वतीने रक्तदान शिबिर

173

देवानंद खिरकर

अकोट ,

देशावर आलेल्या कोरोनासारख्या भयावह रोगापासुन नागरीकाचे रक्षण करण्याकरीता शिवछ्त्रपती साम्राज्य गृप व तहसिल कार्यालय अकोट यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.सदर शिबिर हे ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतच्या मदतीने घेतल्या जाणार आहे.प्रत्येक गावातील सरपंच आपल्या गावातील तरुणांना या शिबिरासाठी प्रोस्ताहीत करीत आहेत.ज्या तरुणांना स्वच्छेने कोरोना सारख्या व्हायरसमुळे देशावर आलेल्या अडचणीत रक्तदान करुन सहकार्य करायचे असेल त्या तरुणांनि आपल्या गावात सरपंचाकडे आपली नावे द्यावीत.दि.30 मार्च ते 2 एप्रील या चार दिवसात आपल्या गावात ग्राम पंचायत मार्फत फिरत्या रक्तपेढी द्वारा रक्तदात्याच्या घरी जाऊन रक्तरक्तदान घेतल्या जाणार,सर्व लोकांनी एकत्रित न येता केवळ आपली नावे सरपंच यांच्याकडे देऊन या शिबिरात सहभागी व्हायचे आहे.शिबिराच्या दिवशी सरपंच यांच्या मार्फत रक्तदात्याच्या घरी जाऊन रक्तदान घेतल्या जाणार.लवकरच जमावबंदी ऊठल्यावर त्यामुलाचे सर्टिफिकेटस देऊन अकोट येथे सत्कार घेण्यात येतिल.अशी माहीती शिवछ्त्रपती साम्राज्य गृपचे अध्यक्ष ऐडवोकेट संतोष खवले यांनी दिली.या शिबिराचा उद्देश दवाखान्यातील भर्ती असणार्या पेशंटला वेळेवर रक्त मिळावे हा असुन यासाठी अकोट तहसिलच्या वतिने तहसीलदार राजेश गुरव व शीवछत्रपती साम्राज्य गृपचे अध्यक्ष संतोष खवले हे प्रयन्त करीत आहेत.व त्यांच्या मदतीला डॉक्टर ठाकरे ब्लडबँक अकोला हे घरपोच रक्तपेढीची व्यवस्था व डॉक्टर ची व्यवस्था करुन देत आहेत.तरी सर्व अकोट तालुक्यातील तरुणांनि देशावर आलेल्या संकटात एकत्रित येऊन लढण्यासाठी स्वेच्छेने रक्तदान करावे.आपन केलेले रक्तदान देशाला कोरोना मुक्त करतांना कामी येऊ शकते.म्हणून रक्तदान करा.देशाला कोरोना मुक्त करा.असे आवाहन संतोष खवले व राजेश गुरव यांनी केले आहे.