महाराष्ट्र

बोर्डी ग्रामस्थांचा लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद…. ग्राम पंचायत बोर्डी कडून कोरोना विषयी जनजागृती….

Advertisements

प्रतिनिधि देवानंद खिरकर

शासन प्रशासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत संचारबंदीत बोर्डी गावातील संपुर्ण दुकानदार,व गावकर्यांनि कडकडीत बंद ठेवुन कोरोना गो चा नारा दिला.
ग्रामसेवक मोहोकार,तलाठी खामकर,सरपंच ताडे हे पुर्णपणे गावातील लोकांना मदत करीत असल्याचे दिसत आहे.
गावामधे सामुदायीक प्रार्थना,नमाज पठण,लग्नंसमारंभ कार्यक्रम ज्या पासुन लोकांचा एकत्र जमाव होवु शकतो असे करु नयेत अशा सुचना देत आहेत.
कोरोना विषयी जनजागृती पादुर्भाव टाळण्यासाठी सरपंच,ग्राम सेवक,तलाठी हे मार्गदर्शन करुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहेत.ग्रामसस्थांना सतर्क राहण्यासाठी गावात वेळोवेळी दवंडी देवून कुणाच्या घरी बाहेर गाववरुन कोणी आल्यास त्याची माहीती ग्राम पंचायत प्रशासनास द्यावी व त्याची आरोग्य तपासणी करूण घ्यावी.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात येत आहेत.गावात ग्राम पंचायत तर्फे कोरोना विषयी जनजागृती उपाययोजणेची फलके लावण्यात आली आहेत.तसेच गावात रस्त्यावर रीकामे फीरणारे व एकत्र जमलेले नागरिकांंना ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार फड साहेब यांच्या मार्गदर्शनात चोख कर्त्यव्य पार पाडत आहेत. डी बी स्काड पथकचे कर्मचारी देखील दिवसातुन तीनवेळा बोर्डीमधे कडक पहारा देत आहेत.

You may also like

महाराष्ट्र

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हाध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा ...
महाराष्ट्र

आ. पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मेंढपाळाणा मास्क वाटप

लोकनेते, विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने मंगळवारी मेंढपाळांना मास्क वाटप ...
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...