Home विदर्भ संचार बंदी असताना कारंजा ला भरला बाजार बाजारात ग्राहकांची गर्दी….!!

संचार बंदी असताना कारंजा ला भरला बाजार बाजारात ग्राहकांची गर्दी….!!

139

कारंजा प्रतिनिधि

वाशिम / कारंजा – नगर परिषद प्रशासनाचे चे दुर्लक्ष कारंजा लाड दि 29 कोरोनाने देशात थैमान घातल्याने देशात 21 दिवसाचा लॉक डाउन असतांना कारंजा नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्ष धोरणामुळे कारंजा शहरात भरला बाजार त्यामुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

या बाबत माहिती मिळताच तहसीलदार धीरज मांजरे यांनी बाजारात गर्दी वाढत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी गर्दी कमी करण्यासाठी ठाणेदार सतीश पाटील यांना आदेश दिलेत. मात्र गर्दी करण्यासाठी बंदी असताना सुद्धा शहरात बाजार भरला याला नगर परिषद प्रशासन जबाबदार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला माहिती असतांना सुद्धा बाजार भरताना याकडे दुलक्ष केल्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या अधिकार्या विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक क्षेत्रातून होत आहे.

नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे यांचे या प्रकाराकडे दुलक्ष होत असल्याने शहरातील बाजार भरण्याचा प्रकार पुढे येत आहे. आज रविवार असल्याची कल्पना मुख्याधिकारी नगर परिषद यांना माहिती असताना सुद्धा त्याचे कर्मचारी घरी झोपा काढतात तर मुख्याधिकारी यांचा फोन बंद असतो त्यामुळे सर्व ताण हा ठाणेदार सतीश पाटील व यांच्या पोलीस कर्मचाऱ्यावर येत असल्याचे कारंजा शहराची कोरोना आजाराची परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यास याला कारंजा नगर परिषद व मुख्याधिकारी जबाबदार राहील. असा सूर सामाजिक नागरिकांकडून निघत आहे. कारंजा शहरात विनाकारण गर्दी होत आहे याबाबीकडे नगर परिषद प्रशासनाचे अतीशय दुर्लक्ष होत आहे इतर यंत्रणा पोलीस व महसुल विभाग चोखपणे कार्य करीत आहे तर नगर परिषद कोणतेही जबाबदारी घेण्यास तयार नाही नगर परिषद मुख्याधिकारी यांचा मोबाईलं गत दोन ते तीन दिवसा पासून बंद आहे ते बेजाबदारपणे वागत आहे सर्व कारंजा शहर कोरोना विरूद्ध लढा देत आहे तरी नगर परिषद आठवडी बाजार भरविणे थांबवू शकत नाही याला काय म्हणावे महानगरामधून कारंजा शहरात अनेक मंडळी आली आहे , त्याची यादी नगर परिषदने पुढाकार घेवून अशा लोकांची यादी तयार करून त्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे नगर परिषद मुख्याधिकारी यांचेकडुन असहकार्य का होत आहे याचा शोध घेणे आवश्यक असून त्यांचे विरूध्द कार्यवाही होणे आवश्यक आहे त्याचे कडे असलेला मुख्याधिकारी पदाचा कार्यभार काढण्यात यावा तसेच सक्षम व्यक्ती याचे कडे मुख्याधिकारी पदाचा कारभार सोपवावा अन्यथा कांरजेकरांना याचे मोठे परिणाम भोगावे लागू शकतात हा मेसेज जनहितार्थ असून तो वाशीम जिल्हाधिकारी मोडक साहेब व आमदार पाटणी यांचेकडे पाठवावा.