Home मराठवाडा कोरोना विषाणूंचा प्रसार राखण्याकरिता नांदेड जील्ह्यातील सर्वर खाजगी मोठे व्यवसाय बंद करण्याची...

कोरोना विषाणूंचा प्रसार राखण्याकरिता नांदेड जील्ह्यातील सर्वर खाजगी मोठे व्यवसाय बंद करण्याची मागणी

213

नांदेड , दि.१९ – ( राजेश भांगे ) :-
नांदेड जिल्ह्यातील सर्व मोठी दुकाने तसेच विवाह सोहळा लग्न कार्य बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना नायगांव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदना द्वारे केली.
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंने भारतात पाय रोवायला सुरवात केली असताना या कोरोना विषाणू बाबत प्रशासकीय व शासकीय सर्व यंत्रणा दिवस रात्र कार्यरत असून पत्रकार परिषदे द्वारे लोकांना गर्दी करू नये व विना कामे घराबाहेर येऊ नये असे आव्हान करत असताना देखील नांदेड जिल्ह्यातील सर्वत्र बाजारपेठ खाजगी मोठे व्यवसाय दुकाने तसेच विवाह सोहळा लग्न कार्य मोठ्या प्रमाणात सुरूच असून या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील शहर गांवातील व्यक्ति मोठ्या संख्येने एकत्रित येण्याने कोरोना विषाणू सारखा आजाराची प्रसारणा होऊन लोकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने पुढील धोका ओळखुन त्वरित या प्रकरणात लक्ष घालावे व नांदेड जिल्ह्यातील चालू असलेले गर्दी चे ठिकाण तात्काळ समाजाच्या आरोग्य हितासाठी हि ठिकाण त्वरीत बंद करावेत
असे निवेदन मध्ये नमूद करण्यात आले आहे.