पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ- ‘कोरोना’ (कोव्हिड-19) विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनिक स्तरावर कोरोना वायरसचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना व निर्देश पाहता यवतमाळ शाहीनबाग आन्दोलन कमिटीच्या शिष्टमण्डलाने प्रशासनाचा आग्रह पाहता 16 मार्च रोजी जिल्हाधिकारी एम.डी.सिंग,तहसीलदार,जिल्हा आरोग्य प्रशासन अधिकारी यांची भेट घेवून चर्चा केली.यावेळी या परिस्थितीत सामाजिक दायित्व पाहता आन्दोलनादरम्यान प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका मांडण्यात आली.प्रशासनाच्यावतीने शाहीनबाग आन्दोलन कमिटिला या लॉक डाऊन परिस्थितीत आन्दोलनस्थली गर्दी होऊ नये असे आग्रह करण्यात आले.त्यामुळे देश व समाजहितासाठी आंदोलनकारी महिला व मुस्लिम समाजाकडुन आता शहरातील मुस्लिम व गैरमुस्लिम भागात सामाजिक सम्पर्क साधुन कोरोना वायरस व यापासुन बचाव करण्यासाठी उपाययोजनांची माहिती व जनजागरण करीत आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडणार आहे.
दरम्यान संविधानाचे आर्टिकल 14 चे उल्लंघन करून केन्द्र शासनाकडुन लागू केलेल्या नागरिकता संशोधन कायदा { सीएए },एनआरसी, एनपीआर हे निर्णय मागे घेत नाही तो पर्यन्त 31 मार्च नंतर अधिक तिव्रतेने यवतमाळ शाहीनबाग आन्दोलनद्वारे शांतिपूर्ण व संविधानिक पद्धतीने आन्दोलन सुरुच राहणार आहे.