Home पश्चिम महाराष्ट्र पदवीधरांनी मतदार नोंदणी करून घ्यावी – प्रदीप पाटील

पदवीधरांनी मतदार नोंदणी करून घ्यावी – प्रदीप पाटील

250
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

आगामी काळात होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अक्कलकोट तालुक्यातील पदवीधर मतदारांनी तातडीने नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख तथा अक्कलकोट तालुका पदवीधर नोंदणी प्रमुख प्रदीप पाटील सर यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. नाव नोंदणी करण्यासाठी पदवीधरांनी तातडीने आपली नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मतदान कार्ड,आधार कार्ड,विवाहीत स्त्री असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पतीचे पॅनकार्ड ,मोबाईल नंबर सह शहरातील भाजप कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
नवीन पदवीधर मतदार नोंदणीकरिता 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा पदवीधर असणेआवश्यक आहे.अक्कलकोट तालुक्यातील सर्व पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी तसेच निवडणूक आयोगाने ऑनलाईन नोंदणीचीही सोय केली.
पदवीधर नोंदणीसाठी प्रदीप पाटील ( 7038701014) ,प्रकाश पाटील ( 9158099789), संदिप कटकधोंड ( 8390459429) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.