Home विदर्भ पातुर, बाळापूर, तेल्हारा व अकोट येथील कोविड केअर सेंटरची पाहणी

पातुर, बाळापूर, तेल्हारा व अकोट येथील कोविड केअर सेंटरची पाहणी

180

प्रा.मो.शोएबोद्दीन

ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवा- पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचे निर्देश

अकोला,दि. 17 – ग्रामीण रुग्णालय पातुर, बाळापूर, तेल्हारा व अकोट येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागात चाचण्या वाढवून जनजागृती मोहीम राबवा. जिल्ह्यात आता सर्वच तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारले जात असून ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील कोवीड केअर सेंटरला आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले.

प्राथमिक रुग्णालयातील कोविड केअर सेंटर व ऑक्सीजन प्लांटची पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, परभणी जिल्ह्यातील आ.राहूल पाटील, पातूर नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, उपविभागीय अधिकारी घूगे,गटविकास अधिकारी, तहसिलदार आदि उपस्थित होते.
आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने पातुर येथील ग्रामीण आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थापण्याट आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये 50 ऑक्सिजन बेडचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे कोरोना काळात बाधीत रुग्णांवर उपचार करणे सोईचे होणार असून या कामी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. कडू यांनी यावेळी केले. ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथील ऑक्सिजन बेडची पाहणी करून बेड संख्या वाढवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.
ग्रामीण रुग्णालय तेल्हारा व अकोट येथील ऑक्सिजन बेडची पाहणी करून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करा. तसेच ग्रामीण भागात कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता आवश्यकतेनुसार ऑक्सीजन बेड उपलब्ध करावे. कमी संसर्ग असलेल्या रुग्णांना गृह अलगीकरण त्यांच्या घरी स्वतंत्र सुविधा असल्याची खातरजमा करूनच द्यावे. रुग्णास औषधी, मास्क, सॅनिटायजर या आवश्यक वस्तू असलेल्या कोरोना किट पुरवाव्या. तसेच रुग्ण कोरोना मुक्त होईपर्यंत त्यांच्या संपर्कात रहावे, असे निर्देश दिले. ग्रामीण भागातील व्यक्तिंनी अंगावर दुखणे न काढता व कोरोना लक्षण दिसताच चाचणी करुन घ्यावी,असे आवाहन ना. कडू यांनी यावेळी केले. यासाठी प्रशासनाद्वारे ग्रामीण भागात कोरोना विषाणूविषयी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच रुग्णालयात उपलब्ध बेड, ऑक्सीजन बेडबाबत माहिती लोकांपर्यंत प्रसारित करावी.
ज्या गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण आल्यास ते गाव बंदिस्त करून त्याठिकाणी चाचण्या कराव्या. किराणा दुकान, भाजी विक्रेते व औषधी दुकानदारांचे चाचण्या करावे. नियमाचे पालन न करण्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले.
अकोट ग्रामीण रुग्णालयात आयोजित बैठकीत लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व वयोवृद्धांना प्रत्येक रविवारी विशेष मोहीम राबवून लसीकरण करा. तसेच दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तीना प्राधान्य द्यावे. लसीकरण केंद्रावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या. केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरीता उपायोजना कराव्या. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करुन लसीकरणाकरीता प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.