Home विदर्भ केळापूर येथे बांधण्यात आलेलं बसस्थानक नॅशनल हायवे 44 विना वापरा ने अडगळीत 

केळापूर येथे बांधण्यात आलेलं बसस्थानक नॅशनल हायवे 44 विना वापरा ने अडगळीत 

227

ग्राहक प्रहार संघटनेने वेधले लक्ष

यवतमाळ / पांढरकवडा –  केळापूर टी पॉइंट वर बस स्थानक बनले आहे शोभेचे बस स्थानक एक वर्ष अवधी उलटून गेला तरी त्या बस स्थानकाच काम पूर्ण झालं नसून बस स्थानक जवळ साचलेला कचरा व घाण हे साप व ईतर वन्य प्राणीसाठी राहण्याचं ठिकाण बनलेलं आहे तरी याची जबाबदारी कोणाची आहेत हे अद्यापही कळाल नाही केळापूर टी पॉईंट वर अनेकदा अपघात झाले असून प्रवासी टी पॉईंट वर बस ची वाट पाहण्यासाठी उभे असतात शासनाने बस स्थानकही बाधले परंतु त्याचा उपयोग अद्यापही केला नाही हे बसस्थानक चालू झाल्यास प्रवाशांना निवारा मिळेल व बसण्यासाठी वाट पाहण्यासाठी एक व्यवस्थित ठिकाण मिळेल अशी अपेक्षा आहेत भविष्यात होणारे अपघात टळणार हे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे व कोण याची जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर काम चालू करणार ही जबाबदारी प्रशासनाची का ठेकेदार याची यांनी लवकर दखल घ्यावी जेणेकरून प्रवाशांना सोयी सुविधा होईल.शासनाने दखल घ्यावी करीता नुकतेच जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन पाठविण्यात आले असून त्या निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ,तालुका प्रचार प्रसार प्रमुख प्रदीप भानारकर सह अनेकांच्या स्वाक्षरी आहेेत.