Home विदर्भ कार्ला येथे चोरी तर आलेगाव येथे चोरीचा प्रयत्न

कार्ला येथे चोरी तर आलेगाव येथे चोरीचा प्रयत्न

198
0

प्रा. मो. शोएबोद्दीन

अकोला – आलेगाव पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे कार्ला येथे एक ऑक्टोबर चे रात्री व 2 ऑक्टोबर चे पहाटे ३:३० वाजता चोरांनी कार्ला गावात धुमाकूळ घालून 4 ते 5 घरात चोरी केल्याची घटना घळली आहे।परंतु सद्या 6 महिन्या पासून घरी असल्याने नागरिकांचे स्वतःचे हाल होत आहे ज्या मुळे 4 घरात चोराचे हाती काहीच लागले नाही।परंतु भारत घायवट यांच्या घरात घुसून त्यांचा खिश्यात ठेवलेले 800 रुपय व घरात ठेवलेले कपड्याचे बैग चोरांनी घरातून बाहेर नेले व बैगेतले कपडे घेऊन बैग तेथेच फेकून दिले अशी बाम माहिती भारत घायवट यांनी दिली ।परंतु चोरी झाल्याची कोणतीच तक्रार पोलिसात करण्यात आली नसल्याचे सुद्धा नागरिकांनी संगितले।काही चोरीला गेले नाही व सद्या शेतात काम धंदे सुरू असल्याने आम्ही पोलिसात तक्रार केली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली परंतु या परिसरात पोलीस पेट्रोलिंग करण्याची मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे .

आलेगाव येथे चोरीचा प्रयत्न फसला

चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे आलेगाव येथी प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर 2 ऑक्टोबरच्या रात्री व 3 ऑक्टोबर च्या सकाळी ३:२५ वाजता सै, युनूस यांच्या घरा बाहेर एक अनुळखी वेक्तीने धुमाकूळ घातले व घराचा दरवाजा उघळा माझ्या मांगे चोर लागले मला वाचवा असे सांगून जोराजोरात सै, युनूस यांचा दरवाजा ठोकला व सोबतच घराची पायरी व नालीची भिंत तोडून टाकले ।काही नागरिक उठल्यावर तो चोर तिथून निघून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली।प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर राहणाऱ्या नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.