Home मुंबई गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न –...

गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न – उदघाटक, गोर पारूबाई जधव

407

मुंबई –  बंजारा हृदय सम्राट, उद्योगपती, गोर किशनभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाणे मुंबई येथील मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या “देवकॉरपोरा” कारपोरेट बहुमंजली बिल्डिंगमध्ये असलेल्या आठव्या माळ्यावरती उद्योपती गोर किशनभाऊ राठोड यांनी आपल्या मल्टीनॅशनल कंपनी कार्यालयाचे उदघाटनासाठी कोणत्याही मंत्री, खासदार, आमदारांना, निमंत्रीत न करता एक नवीन पायंडा पाडून संपूर्ण देशातील गोर बंजारा समाजाला नवी शिकवन दिली आहे.

समाजतील संस्कृती, वेशभूषा,। गोरबोली भाषा जोपासणार्या आदर्श महीला पुरस्कार प्राप्त गोर पारुबाई जाधव, या समाज सेविकेच्या शुभहस्ते आपल्या भव्य-दिव्य कार्यालयाचे उदघाटन समारोह करण्याचे ठरवून एक नवीन दिशा समाजात रुजविण्याचे अमूल्य कार्य मा. राठोड साहेब यांनी केले आहे, मुंबई सारख्या मेट्रो सिटी मधे, प्रथमच पार पडत असलेल्या समारंभाचे उदघाटीका, गोर पारूबाई जाधव ह्या बंजारा (पेहरावा) वेषभूषेत जॅगवार कार घेवून उदघाटन स्थळी पोहोचताच सगळ्यांचे लक्ष केंद्रीय झाले, सकाळपासुन कुणीतरी सिनेतारीका, मंत्री येण्याच्या चर्चेला गोर पारुबाई जाधव हीची कारच्या खाली एन्ट्री होताच त्यांनी सगळ्यांच्या नजरा हीरावून घेतल्या, गोर बंजारा वेषभूषेत मोठ्या थाटात आदरपूर्वक पुष्पवृष्टी करुन त्यांच्या शुभहस्ते नियोजित कार्यलयाचे पुजन करण्यात आले, ह्या प्रसंगी उद्योगपती गोर मा.किशनभाऊ राठोड गोर मा. प्रकाशभाऊ राठोड प्रवक्ता, राष्ट्रीय बंजारा परिषद यांचेसह संपूर्ण स्टाप यांच्या प्रमुख उपस्थितित गोर बंजारा रुढी परंपरेनूसार कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न झाले.