Home विदर्भ यवतमाळ शहरातील रंभाजी नगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस...

यवतमाळ शहरातील रंभाजी नगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

107
0

वासीक शेख

यवतमाळ – यवतमाळ शहरातील रंभाजी नगर, वाघापूर, वार्ड नं. 15 येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कामा संदर्भात येत असलेल्या नाली व रपटा याचे बांधकाम करण्यात यावे यासाठी आज दिनांक 01/10/2020 रोजी मा. कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदना द्वारे करण्यात आली.
स्थानिक रंभाजी नगर, वाघापूर, वार्ड नं. 15 येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे Under Ground Sewer line चे काम चालू असतांना बर्‍याच ठिकाणी JCB च्या कामा दरम्यान जुनी नाली व रपटा पूर्णपणे ध्वस्त झाले आहेत.
यामुळे नालीचा वाहता प्रवाह थांबून गेला असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे व येथील रपटा पूर्णपणे ध्वस्त झाल्याने वाहतुकीस प्रतिबंध निर्माण झाला आहे आणि तेथे आरोग्यास हानिकारक असलेले नाली चे पाणी साचून बरेच दिवस उलटून गेले आहेत.
काल सायंकाळी एक दूध विक्रेता त्याच्या गाडीवर दूध घेऊन संबंधित रस्त्यावरुन जात असतांना तो त्या ध्वस्त झालेल्या रपट्यातील खोल खड्यात गाडी सहित पडला, यामुळे त्याला शारीरिक इजा झाली व त्याचे दूध पुर्णपणे नाली मध्ये वाहून गेले. सायंकाळी बरीच लहान मुले बाहेर खेळत असतात, या अश्या परिस्थिती मुळे परिसरातील लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची अशी मागणी आहे की, नाली व रपटा याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही व तेथील वाहतूक सुरळीत होईल.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अश्विन कयापाक यांच्या पुढाकाराणे निवेदन देणात आले , उपस्थित जिल्हा चिटणीस स्वप्नील खोब्रागडे, सुमित लांडगे, श्रेयश मुटकुरे, प्रशांत किर्दक, राजीक पठाण, दीक्षा नगराळे, मनीष आडे, योगेश आडे, राज खोब्रागडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.