Home परभणी सहकार्‍यांची दुकाने वाचवू शकलो नाही याचं दुःखच – सखाराम बोबडे पडेगावकर

सहकार्‍यांची दुकाने वाचवू शकलो नाही याचं दुःखच – सखाराम बोबडे पडेगावकर

85
0

गंगाखेड -मोठ्या विश्वास आणि एकजुटीने आम्ही दुकाने वाचविण्यासाठी उपोशन केले, सहकाऱ्यांची दुकाने वाचवू शकलो नाही याची दुःखच असले तरी सर्वांच्या सहकार्याने पुनर्वसनाची लढाई जिंकू अशी प्रतिक्रिया सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुकान हटाव मोहीम राबविण्यात आली. यावर सर्वच दुकाने वाचवण्यासाठी पाच दिवस चाललेल्या उपोषणात अग्रेसर असणारे सखाराम बोबडे पुढे म्हणाले की सर्व दुकानदार व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही लढाई एकजुटीने लढली. आपण संपर्क करून राज्य पातळीवरील बहुतांश लोकप्रतिनिधी ची मदत घेण्याचा प्रयत्न केला. ही दुकाने वाचण्यात जरीअपयश आले असते तरी यापुढे होणारी पुनर्वसनाची लढाई मात्र दुकानदार व पदाधिकारीच्या सहकाऱ्यांवर शंभर टक्के जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सय्यद नबी सय्यद हसन, सय्यद हूसन सय्यद युसुफ,किशनराव आडकीने, सय्यद शकील सय्यद सलीम उपस्थित होते.