Home विदर्भ खानगाव (गोटाडे) येथे दोन चिमुकल्या मुलासह विवाहित महिलेची आत्महत्या.!

खानगाव (गोटाडे) येथे दोन चिमुकल्या मुलासह विवाहित महिलेची आत्महत्या.!

101

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा खानगाव (गोटाडे) येथे दोन चिमुकल्या मुलासह २४ वर्षीय विवाहित महिलेने विहरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपलवली. ही घटना आज १२ वाजताच्या सुमारास गावाजवळील बावापूर शिवारात शेतात घडली. मृतक विवाहित महिलेचे नाव निर्मला सुमित कुरवटकर वय २४वर्ष, कु. राधिका सुमित कुरवटकर वय ४वर्ष, कु.काजल सुमित कुरवटकर वय ३वर्ष अशी चिमुकल्यांची नावे आहेत. ही मृतक महिला बंजारा समाजातील असून रा.गवंडी (खरडा) ता.बाभुळगाव जि. यवतमाळ येथील मूळची रहिवासी असून गेल्या दोन महिन्याभऱ्यापासून या भागात मेंढ्या शेळ्या पाळण्याचा व्यवसाय करीत असे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक महिलेचे कुटुंब आणि इतर नातलग असे जवळपास दहा कुटुंबे गेल्या दोन महिन्यांपासून खानगाव (गोटाडे) या भागात मेंढ्या शेळ्या पालनाचे काम करीत होते. ती सर्व कुटुंबे खानगाव येथील महेश ठाकरे यांच्या गावाजवळील शेतात बेडे ठोकून वास्तव्यात होती. काल शिवारात मेंढ्या चारण्यासाठी गेले असता मृतकाचे कुटुंबाचे बैलजोडी रानात भटकली होती. आज सकाळी पुरुष मंडळी शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी रानात गेली आणि महिला मंडळी बैल शोधण्यासाठी फिरत होती. मात्र काही केल्या बैलांचा शोध न लागल्याने मृतकाच्या सोबत असलेली महिला मंडळी बेड्यावर परत गेली मृतक महिला मात्र चिमुकल्यांना घेऊन रानात च थांबली. त्यानंतर उशिरा पर्यंत मृतक निर्मला बेड्यावर न आल्याने बेड्यावरील सगळे जण तिच्या शोधार्थ परत रानात गेले असता बावापुर शिवारातील ज्ञानेश्वर थुल यांच्या शेतातील विहिरी जवळ तिची चप्पल आढळून आली त्यानंतर सगळ्यांनी विहरीत डोकावून बघितले असता मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती खानगावचे पो.पाटील संजय पाटील यांनी अल्लीपुर पोलीस ठाण्याला दिली.
अल्लीपुर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून जमादार त्रंबक मडावी, शिपाई सतीश नैताम यांनी घटनास्थळ गाठले आणि मृतक महिलेसह चिमुकल्यांना विहरीतून बाहेर काढले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून प्रकरण तपासात घेतले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकलेले नाही.