Home जळगाव एरडोंल तालुक्यातील अनेकजण शिधापत्रिका पासून वंचित,नायबतहसिलदारांना निवेदन

एरडोंल तालुक्यातील अनेकजण शिधापत्रिका पासून वंचित,नायबतहसिलदारांना निवेदन

547

नवीन शिधापत्रिका देण्याची आरपीआय आठवले गटाची मागणी

एजाज शाह

जळगाव ,

एरंडोल तालुक्यातील अनेक नागरिकांना शिधापत्रिका नाही त्यामुळे शासकीय कडून मिळणारा धान्यापासून ते वंचित राहतील त्यांना नवीन शिधापत्रिका मिळावी म्हणून आर पी आय आठवले गटा कडून नायब तहसीलदार श्रीमाळी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की देशात व राज्यात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे 21 दिवसाच्या लॉक डाऊन कालावधी मुळे जनतेला अत्यंत अडचणी समोर जावे लागणार आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे गोरगरीब जनतेला शासकीय धान्य मिळण्याकरिता शिधापत्रिका आवश्यक आहे परंतु अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नाही त्यामुळे गोरगरीब जनता शासकीय धन्या पासून वंचित राहतील तरी त्यांना त्वरित नवीन रेशन कार्ड मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर सचिव देवानंद बेहरे तालुका उपाध्यक्ष सिताराम मराढे उपस्थित होते