Home मराठवाडा देगलूर मध्ये लॉकडावुनच्या काळात गरजुंच्या मदतीसाठी धावले समाजसेवक व कै. शिवा कोंडेकर...

देगलूर मध्ये लॉकडावुनच्या काळात गरजुंच्या मदतीसाठी धावले समाजसेवक व कै. शिवा कोंडेकर सेवाभावी संस्था

49
0

नांदेड, दि.३; ( राजेश भांगे ) – कोविड १९ नोबेल कोरोना व्हयरस ने संपुर्ण देशात व राज्यात सर्वत्र आपले पाय पसरायला सुरवात केल्ल्याने दि. २३ मार्च पासुन पंतप्रधान मंत्री व राज्याच्या मुख्यमंत्रींनी पुढिल आदेश येई पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदि, लाॕकडावुन जरी केले असल्याने देगलूर शहरातील नागरिकांना अडिअडचनीच्या काळात एक मदतीचा हात म्हणून कै. शिवा कोंडेकर बहुउशीय सेवाभावी संस्थेने अपात्कालीन परिस्थितीत रूग्णसेवा म्हणून गाडि सोय करून देत देगलूर शहरातील अतिशय गरिब कुटुंबातील चिमुकल्या लेकराच्या उपचारासाठी तसेच गर्भवती महिलेला व भक्तापुर रोड देगलूर येथील रूग्णाला आज नांदेड येथे उपचारासाठी जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली व करडखेल येथील एका व्रध्द व्यक्तीस दम्याचा त्रास असता त्यास उदगीर येथे पाठविले असुन हि रूग्णसेवा अविरत चालुच असुन अशा अपात्कालीन परिस्थितीत सर्व सामान्यांच्या अडिअडचणीत मोठी कामगिरी बजावल्याचे मानुन कै,शिवा कोंडेकर बहुउदेशिय संस्थेचे व मित्र मंडळाचे शहरात सर्वत्र कौतुक होताना दिसुन आले.

तरी यावेळी विविध पक्षाचे समाजसेकांनी सुद्धा दिनदुबळ्यांच्या मदतीला धावुन येत गोरगरिबांच्या वस्तित जावुन अनधान्य व साहित्य वाटप करीत मोलाचे कार्य करित आहेत व फोटो काढून चढाओढीने सोशल मिडियावर टाकत आहेत.

तसेच एक विशेष सुचना शहरातील अनेक वार्डांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असुन गेल्या दोन महिन्यात डेंगुने व आता कोरोना व्हायरस ने डोके वर काढले असले तरी हि न.पा. स्वच्छता व आरोग्य विभागा कडुन डासांचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही ठोस पाऊले उचल्याचे दिसत नसल्याने नागरिकांन मधुन नाराजी व्यक्त केली जात आहे व यामध्ये गांभीर्य पुर्वक लक्ष घालावे असे सर्व सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Unlimited Reseller Hosting