Home मराठवाडा लोकडाऊन च्या काळात अवेध दारू विक्री वाढली दोन ठिकाणी पोलिसांचा छापा ,

लोकडाऊन च्या काळात अवेध दारू विक्री वाढली दोन ठिकाणी पोलिसांचा छापा ,

33
0

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे सकाळी १२ वाजेच्या सुमारास कोरोना विषाणूचा प्रादृर्भाव वाढू नये म्हणून सर्व भारतासह जिल्हा बंद असताना अवैद्य देशी दारु विक्री होत असल्याचे एका खबऱ्या मार्फत माहीती मिळताच बदनापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील यांनी तात्काळ धाड टाकून अवैद्य देशी विक्री करताना आरोपी शारदा रामा पवार रा. शेलगाव याच्या कडे देशी दारुच्या ६० बाॕटल अंदाजे किंमत ३३०० रुपये व राजेवाडी शिवारातील आरोपी शारदाबाई लक्ष्मण पवार यांच्या कडे १६ देशी बाॕटल अंदाजे ८८० रुपये किंमत असे जप्त करुन फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील यांच्या फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पो.हे.काॕ. ज्योती खरात करीत असल्याचे ठाणे अमलदार यांनी सांगीतले . ही कार्यवाही पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील , पो.हे.काॕ. आय जी. शेख , बम्हांवत , शिवाजी भगत , ज्योती खरात यांनी पार पाडली .

Unlimited Reseller Hosting