Home मराठवाडा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद

137

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. २१ :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शनिवार रोजी सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश दिले यामुळे स्थानिक प्रशासनाने आज शनिवार (ता.२१) रोजी आणि पंतप्रधान यांच्या जनता कर्फ्यूमुळे उद्या रविवार (ता.२२) रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने स्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आज माहूर शहर अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शनिवार रोजी सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश दिले यामुळे आज उद्या बंद परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, न.प च्या मुख्यधिकारी श्रीमती विद्या कदम, माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी माहूर बाजार पेठेत स्वतः फिरून जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळ पासूनच माहूर शहरात व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने बंद होण्यास सुरुवात झाली भाजीपाला किराणा व मेडिकल, अशा अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली.