Home मराठवाडा साप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची बिनविरोध निवड

साप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची बिनविरोध निवड

43
0

सय्यद नजाकत

जालना,दि.२० (प्रतिनिधी)- जालना जिल्हा साप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात एकही साप्ताहिक संघटना कार्यरत नसल्याने आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात जालना जिल्हा साप्ताहिक संपादक संघ या नावाने संघटना स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष विकास बागडी, सचिव शाहनवाज कुरेशी, सहसचिव सय्यद अफसर, उपाध्यक्ष नवनाथ जोगदंड, सय्यद करीम, कोषाध्यक्ष खलील खान, सहकोषाध्यक्ष मुकेश परमार्थ, सदस्य राजेश गौड, नरेश धारपवळे, दिनेश नंद, इमरान खान, शेख मुजीबोद्दीन, रमेश गंगोदक, शेख राजमोहम्मद, अशपाक पटेल, शेख नबी, गोकुळ स्वामी आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, साप्ताहिक संपादक संघाची पुढील महिन्यात एक व्यापक बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत साप्ताहिक संपादक संघाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आणि भविष्यात पत्रकारांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांबाबत माहिती देऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास बागडी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या बैठकीस बहुतांश साप्ताहिक संपादकांची उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting