मराठवाडा

प्रयत्न आणि सातत्य यांच्या जोरावर योगेश झाला PSI

Advertisements

व्यापारी प्रगती असोसिएशन करमाड च्या वतीने भव्य सत्कार

अब्दुल कय्युम

करमाड । म्हणतात ना . . जिद्द असेल तर काहीही साध्य करता येतं याचा प्रत्यय करमाड येथून जवळ असलेल्या मंगरूळ या छोट्याश्या गावातील योगेश कल्याण चिंचोले या युवकाने प्रत्यक्षात करून दाखवला.
राज्य लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत 248 गुण मिळवत योगेशने यश संपादन केले आहे
यावेळी पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण योगेश चिंचोले यांनी सांगितले की स्वतःवरील विश्वास अपार कष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ या मुळेच आपण या यशा पर्यंत पोहोचू शकलो अशी भावना यांनी व्यक्त केली,
अतियशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत योगेशने ही उत्तुंग भरारी घेतली असून या यशाचे कौतुक करण्यासाठी करमाड येथील व्यापारी प्रगती असोसीयनच्या वतीने योगेश चिंचोले याच सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प मते महाराज औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष रामुकाका शेळके पंचायत समितीचे माजी सभापती कैलास भाऊ उकर्डे करमाड चे उपसरपंच दत्ताभाऊ उकिर्डे माजी सरपंच विठ्ठल कोरडे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.जिजा कोरडे लाडगावचे उपसरपंच संतोष बागल शाळेत समितीचे सदस्य मिर्झा हरुण सय्यद कदिर न्यू हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती पवार मॅडम शिक्षक सुदाम घावटे सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भोसले सर यांनी केले तर व्यापारी प्रगती असोसिएशनचे अध्यक्ष रमेश आघाडे यांनी सर्वांचे आभार मानले

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...