Home मराठवाडा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. वि.इटनकर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. वि.इटनकर

258
0

नांदेड दि.१९ ( राजेश भांगे ) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासन विविध माध्यमातून जनजागृती करीत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, शासकीय वैद्यकीय महावि‍द्यालय अधिष्ठादता डॉ. चंद्रकांत मस्केा, जिल्हा् शल्यट चिकित्स्क डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हाी आरोग्या अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, रेल्वे स्थानक, विमानतळ, खाजगी बसस्थानक २४ तास तत्पर ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक साधन सामग्रीसह आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहेत. कोरोना संदर्भात शिक्षक, अशा कार्यकर्त्या यांच्यावतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असून आवश्यक त्या सुचना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना यावेळी देण्यात आल्या.

Previous articleदुचाकी चोरट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,
Next articleThere is absolutely no need to wear a mask if you are not ill – Shama Sikander
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.