मराठवाडा

दुचाकी चोरट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अब्दुल कय्युम

औरंगाबाद : दुचाकी चोरणारया मध्यप्रदेशातील एकाला गजाआड करण्यात सातारा पोलिसांना यश आले असुन दुचाकी चोराकडून १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हिरालाल गणपत कानोजीया (वय२२, रा. पाडल्या ता. जिरण्या जि. खिरगोन राज्य मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
प्रकरणात कबीर नगर, उस्मानपुरा परिसरात राहणारे अभिजीत अजय साठे (वय २९) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएस-३५०५) १ पेâब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील हॉटेल टिलु टचच्या पार्कींगमधुन चोरीला गेली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, महिनाभरापुर्वी हॉटेलच्या पार्कींगमधुन दुचाकी चोरणारा हिरालाल कानोजीया हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांच्या मागदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विक्रांत वडने, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र ससाने, सखाराम सानप, जमादार कैसर पटेल, प्रदिप ससाने, लांडे पाटील, अभय भालेराव आदींनी सापळा रचून कानोजीया याला अटक केली.

You may also like

मराठवाडा

स्वतःच्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकणाऱ्या मातेस जन्मठेप

औरंगाबाद   नवजात अर्भकाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी महिलेला प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे ...
मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...