Home बुलडाणा पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या ,

पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या ,

73
0

रवी अण्णा जाधव ,

देऊळगाव मही

सततची नापिकी आणि पीक कर्जमाफी च्या यादीमध्ये नाव न आल्यामुळे ६१ वर्षीय उत्तम रोडु सपकाळ या शेतकऱ्याने पाण्याच्या
टाकीवर चढून गळफास घेवून आत्महत्या केली . ही घटना पिपळवाडी येथे घडली .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळवाडी येथील रहिवाशी असलेले
उत्तम रोडु सपकाळ यांच्याकडे मिसाळवाडी शिवारात गट नं १२० मध्ये कोरडवाहू दिड
ते दोन एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी जवळच असलेल्या बँक आँफ महाराष्ट्र
शाखा मेरा खुर्द या बँकेकडून ४० हजार रुपये पीक कर्ज घेतले होते.तसेच विदर्भ
कोकण ग्रामीण बँक चिखली या बँकेकडून ६० हजार रुपये कर्ज घेतले होते . या
घेतलेल्या कर्जाची उत्तम सपकाळ यांच्याकडून परतफेड होवू शकली नाही . आणि आता
शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसकट पीक कर्ज माफी केली आहे . मात्र या
पीक कर्ज माफीच्या यादीमध्ये आपले नाव नाही . आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे हे
पाहून शेतकरी उत्तम रोडू सपकाळ यांनी सकाळी पत्नीला सांगितले की मी शेतात
जावून येतो आडे सांगून शेतात गेले आणि शेळगाव आटोळ प्रादेक्षिक पाणी पुरवठा
टाकीवर चढुन लोखंडी जिन्याला दोरी बांधून गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा
संपविली. या घटनेची माहिती सुरेश लक्ष्मण सपकाळ यांनी पोलीस स्टेशन दिली . या
माहितीवरून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पंजाब
साखरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून पंचसमक्ष पंचनामा करुण मर्ग दाखल
केला.