Home जळगाव आगग्रस्त कुंटुबास महाराष्ट्रातील तडवीभिल समाजाचा मदतीचा हात

आगग्रस्त कुंटुबास महाराष्ट्रातील तडवीभिल समाजाचा मदतीचा हात

35
0

रावेर (शरीफ शेख)

मध्यप्रदेशातील बुर्हानपुर जिल्ह्यातील निम्बोला कार्यक्षेत्रातील खामला या गावातील नशिर मोहम्मद तडवी यांचे राहते घरात दि १४ मार्च रोजी निंद्रावस्थेत असतांनाच रात्री १:३० मि.सुमारास अचानक आग लागुन घरातील जीवनोपयोगी साहित्य ,कपडे, यांसह संपूर्ण संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली व आगग्रस्त परीवार उघड्यावर आले
*आगग्रस्त कुटूंबात लग्न घटीका समीप असतांनाच घरासह संसाराची क्षणार्धात झाली राखरांगोळी*
कारण सकाळी च नशिर मोहम्मद तडवी यांच्या मुलाचा लग्न सोहळा असल्याने नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच घराला अचानक लागलेल्या आगीत आशा आकांक्षा भस्मसात झाल्या व संपूर्ण परिवारावर दुःखा चां डोंगर कोसळला आशेची निराशा झाली या पिडीत परिवाराला ऐन लग्न प्रसंगी मदत देईल तेव्हा देईल पण समाज घटक असल्याचा उद्देश अंगीकारत महाराष्ट्रातील तडवी समाजातल्या सतत सुखादुखात सहभागी होणार्या तीन अनमोल रत्न ( त्रिमूर्ती )यांनी सोशल मीडिया वर या गंभीर घटनेचं वृत्त पाहताच आगग्रस्त कुटूंबास सहानुभूती पर मदत करण्यासाठी व आगग्रस्त कुटूंबाचे दुखात सहभागी होत पुढाकार घेतला व तात्काळ १५०००/- पंधरा हजार रुपये देऊन तडवी समाजातील व्हाटसअप ग्रुप द्वारे समाज बांधवांना ही मदत देण्याचे आवाहन केले याच गंभीर घटनेच आवाहन समाजमनाचे स्विकारत शक्य तितका सहभाग घेत तात्काळ फोन पे च्या आधारे ६०००/- रुपये मदत त्रिमूर्ती समुहाचे सुपुर्द केली अशी एकूण रुपये २१०००/- हजार ची रोख सहानुभूती पर मदत घेऊन असलम तडवी ,संजू तडवी लोहारा,अय्युब तडवी जळगांव,तसलिम तडवी कुसुंबा,मुराद तडवी मालोद,शब्बीर तडवी शिरपुर, मोहम्मद तडवी पातोंडा,वाहेद तडवी सारोला, आदिंनी मध्यप्रदेशातील खामला या गावी समक्ष जाऊन ऐन दुःखा चे घडीला शेजारील पर राज्यातील समाज बांधवांनी केलेल्या या सामुहिक सहानुभूती पर मदत स्विकारण्या प्रसंगी त्या पिडीत आगग्रस्त कुटूंबातील सदस्य व ग्रामस्थांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting