Home बुलडाणा विवाहीतेचा घरात घुसून विनयभंग. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल .

विवाहीतेचा घरात घुसून विनयभंग. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल .

76
0

रवि आण्णा जाधव,

देऊळगाव राजा: – घरा शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग केला . ही घटना १६ मार्च रोजी अंत्री खेडेकर येथे घडली .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवासी असलेले भिमराव मोरे हे गावामध्ये मुलाबाळासह राहतात. भीमराव मोरे हे दि १५ मार्च रोजी सकाळी शेतात कामाला गेले . आणि पत्नी सौ वर्षा भीमराव मोरे ह्या घरामध्ये घरकाम करीत असतांना १० वाजेच्या दरम्यान गावातील उध्वव भिकाजी झिने हा घरी आला आणि विचारले की भिमराव कुठे गेला आहे .असे विचारल्याने शेतात गेले आहे असे सांगून घरात जात असताना पाठीमागेच उध्वव झिने हा घरात घुसला आणि हात धरून ओढत विनयभंग केला .त्यामुळे आरडाओरडा केला असता घराशेजारी राहणारे द्वारकाबाई खेडेकर, प्रल्हाद खेडेकर हे आवाज ऐकून धावत आले हे पाहून उध्वव झिने हा घरातून पळून गेला. मात्र त्याचा बूट घरातच राहिला हा प्रकार पती भीमराव मोरे यांना फोन लावून सांगितली. आणि रितसर पोलिस स्टेशनला येऊन रिपोर्ट दाखल केला. या तक्रारीवरून अंढेरा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार शाकिर पटेल यांनी आरोपी उध्वव भिकाजी झिने
यांच्या विरुद्ध कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.