Home सोलापुर न.प. प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल या शाळेस उपक्रमशिल शाळा पुरस्कार प्राप्त

न.प. प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल या शाळेस उपक्रमशिल शाळा पुरस्कार प्राप्त

150

सतीश मनगुळे

अक्कलकोट :- दि .७ मार्च २०२० शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य प्राथ . शिक्षक संघांचे वतीने भव्य बाल लोकनृत्य स्पर्धा सन २०२० , सुर्जनशिल शिक्षक पुरस्कार , उपक्रमशिल शाळा पुरस्कार घेण्यात आले .न.प. प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल या शाळेस बाल लोकनृत्य स्पधेत लहान गटात उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे रोख बक्षिस , ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच शाळेस उपक्रमशिल शाळा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकरलिंग खजुरगीकर यांचे मा .आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी ,प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले यावेळी शिक्षक संघाचे मा . बाळासाहेब काळे , अध्यक्ष .विरभद्र यादवाड, न .प. नगराध्यक्षा सौ . शोभाताई खेडगी पंचायत समिती अध्यक्षा सौ . सुनंदाताई गायकवाड ,उपाध्यक्ष मा . प्रकाश हिप्परगी जि.प. माहिला बाल कल्याण समिती अध्यक्षा सौ . स्वातीताई शटगार ,न .प. प्रशासनाधिकारी मा . शाहु शतपाल व इतर मान्यवर उपस्थित होते शहर शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी बंडगर, सरचिटणीस गुरूसिद्ध कोरे ,निंजलिंगप्पा बहिरगोंडे ,सिद्धाराम पुजारी , इस्माईल जमादार , जाविद अन्सारी , महिला जिल्हा प्रतिनिधी सौ .वर्षा तडकलकर यांनी अभिनंदन केले .बाल लोकनृत्य स्पधेत यश संपादन व शाळा उपक्रमशिल करण्यास सौ . जयश्री मोरे , श्रीमं . शशिकला मुकणार , अनिता व्हसुरे यांनी परिश्रम घेतले .