Home विदर्भ कोरोनाच्या सतर्कतेसाठी दिग्रस येथे मानवता आंदोलन, भारत देशातील मनोरुग्णा प्रती जनतेनी असे...

कोरोनाच्या सतर्कतेसाठी दिग्रस येथे मानवता आंदोलन, भारत देशातील मनोरुग्णा प्रती जनतेनी असे उपक्रम राबवावे – मोहण जाधव

107
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १७ :- जगातील कोरोना व्हायरसने देश, विदेशात चिंता व दहशतीचे वातावरण परले आहे, याला घाबरून न जाता एक पाऊल पुढे या प्रमाणे खारुताईच्या भूमिकेत “राष्ट्रीय बंजारा परिषद” गोर टायगर्स, जन सेवा संघाच्या वतिने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एक मनोरूग्ण शहरात फिरून भिक मागून जिवन जगत असल्याचे लक्षात आले, त्यांनी कित्तेक वर्षापासुन आंघोळ केली नसेल वाढलेले केस किती जिव जंतूने तो वैतागलेला होता, अश्या मनोरुग्णावरच प्रथम कोरोना व्हायरल येईल, असे मत गोर टायगर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिग्रस येथील मणोरूग्णाला पाहुन सांगितले जर असे झाले तर गर्दीच्या ठीकाणी फीरणारे अशी कितीतरी मणोरूग्ण आपल्या देशात आहेत, ज्याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही, म्हणून अश्या मनोरूग्णावर लक्ष केंद्रीय करुन सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिग्रस येथील मनोरूग्णाला पकडून त्यांची वाढलेले केस, दाढ़ी काढून स्वच्छ पाण्याने आघोळ घालून नवीन कपड़े, घालून त्यांची दवाखाण्यात तपासणी करून जेवन देवून दिग्रस पोलीस स्टेशन येथे सुपुर्द केले .
एकीकडे जगात कोरोना व्हायरसवर उपचारसाठी संशोधन सुरू असुन करोडो अरबोच्या जाहीरातीतुन सावधान व स्वच्छतेवर, राहणीमानावर भर दिल्या जात आहे, कोरोनावर मात करण्यासाठी “राष्ट्रीय बंजारा परिषद”, गोर टायगर्स, व मानवता सेवा संघ, या सामाजिक संघटनेनी खारूताईचा वाटा म्हणून सामाजिक दाईत्व जोपासण्यासाठी यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामधे असे उपक्रम राबवण्याचे निर्धार केले आहे, रस्त्यावर राहत असललेले, तसेच घाणेरड्या जागेत, चौकावर राहणारे, वर्षानू वर्षापासून आंघोंळ न केलेले मळकट कपडे केस वाढलेल्या अवस्थेत शहर खेड्यातील राहणार्या पुरुष/महीलांकडे समाजातील सगळीच मंडळी मतीमंद, पागल समजून दुर्लक्ष करतात, परंतु अशी माणसे किती प्रकारचे व्हायरस घेवून फिरतात याकडे कुणाचेच लक्ष नाही, म्हणून अश्या लोकांचे शोध घेवून त्यांची अडचन बघून विचारपुस करून त्यांची स्वच्छता व योग्य औषधोपचार करून माणूसकीच्या दुनियेत आणण्याचा प्रयत्न या सामाजिक संघटना करीत आहे, दिग्रस येथील मानवता आंदोलनाचे संयोजक मोहणभाऊ जाधव जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद यवतमाळ, श्री.ज्ञानेश्वरजी चव्हाण जिल्हाध्यक्ष युवा राष्ट्रीय बंजारा परिषद, वाशिम, श्री धनराजभाऊ राठोड अध्यक्ष जन सेवा संघ, अमर पवार सचिव, डॉ.सुरेश जाधव ३tv. बंजारा, पोहरागड, कखुशाल राठोड़, संदीप राठोड़, दिनेश शिंदे, मंगेश लोखंडे भाऊ यांचेसह कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते .

Previous articleपाचोरा नगरपालिकेत आमदार किशोर पाटील यांच्‍या उपस्थितीत करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कामी बैठक संपन्‍न
Next articleन.प. प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल या शाळेस उपक्रमशिल शाळा पुरस्कार प्राप्त
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here