Home जळगाव पाचोरा नगरपालिकेत आमदार किशोर पाटील यांच्‍या उपस्थितीत करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कामी...

पाचोरा नगरपालिकेत आमदार किशोर पाटील यांच्‍या उपस्थितीत करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कामी बैठक संपन्‍न

131

निखिल मोर

पाचोरा , दि. १७ :- जगभरात करोना आजाराने थैमान घातले असून, राज्यातदेखील शिरकाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात खराबदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि.16/03/2020 रोजी) आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आली.

यावेळी नागरिकांनी करोना या आजाराला घाबरून न जाता पुढील 15 दिवस आवश्यक ती काळजी घ्यावी. नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच आरोग्य विभागाने करोना आजाराविषयी जनजागृती करावी, आरोग्‍य कर्मचारी यांना मास्‍क पुरविण्‍यात यावेत.
पालिकेने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, करोना विषाणूच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी. शहरात व्‍यापक स्वच्छता अभियान राबवावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी शास्त्रीय माहिती सोप्या व सुलभ भाषेत माहिती पत्रके प्रसिद्ध करावीत. असे निर्देश आमदार किशोर पाटील यांनी या वेळी दिले.
या वेळी बैठकीस आमदार किशोर पाटील, नगराध्‍यक्ष संजय गोहील, उपनगराध्‍यक्ष शरद पाटे, मुख्‍याधिकारी श्रीमती शोभा बाविस्‍कर , उद्योगपती मुकूंद अण्‍णा बिल्‍दीकर, नगरसेवक वाल्मिक पाटील, धमेंद्र चौधरी, माजी नगरसेवक गणेश पाटील,
प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, अभियंता मधुकर सूर्यवंशी, आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, कर निरीक्षक दगडू मराठे, पा.अभियंता जितेंद्र मोरे, लेखापरिक्षक नितीन लोखंडे, संगणक अभियंता मंगेश माने, लेखापाल दत्‍तात्रय जाधव, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, भांडारपाल प्रगती शेळके, विधी विभागाचे भारती निकुंभ, रोखपाल सुधीर पाटील, लिपीक ललित सोनार, लिपीक विशाल दीक्षित आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.