Home महत्वाची बातमी जिथे दु:ख,गरीबी,सामाजिक त्रास असतो,तिथेच कविता जन्माला येते. जेष्ठ कवि श्रीपत मोरे. भारत...

जिथे दु:ख,गरीबी,सामाजिक त्रास असतो,तिथेच कविता जन्माला येते. जेष्ठ कवि श्रीपत मोरे. भारत कवितके,मुंबई

161
0

रवि अण्णा जाधव

देऊळगाव राजा:-भाईंदर येथील एस.एम.पब्लीक स्कूलच्या सभाग्रहात विकास संशोधन प्रतिष्ठानचे पर्व दुसरे ,कविसंमेलन क्रमांक 22 वे.रविवार दिनांक 15मार्च 2020 रोजी सायंकाळी 5ते 8या वेळेत रंगतदारपणे पार पडले.
शाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा,भारत कवितके यांनी ‘पाहणे तुझे…’,निलेश सरवणकर यांनी ‘कसे सागू मी आज….’,विजय म्हामुस्कर यांनी गजल,प्रमोद सूर्यंवंशी यांनी ‘ नको मला बंधन…’ ,निलेश हेंबाडे यांनी ‘कोरोना आला दारी….,चंद्रशेखर परांजपे यांनी ‘खुपले ते सांगितले..’,सरोज गाजरे यांनी ‘ सारे आकाश माझे…’ लक्ष्मण शिवणेकर यांनी ‘कोरोना वायरस…’विठ्ठल घाडी यांनी ‘जन्मा यावे देशासाठी….’श्रीपत मोरे यांनी ‘मागे वळून पाहताना…..’ अशा विविध विषयाच्या,विविध आशयाच्या रंगतदार कविता सादर करण्यात आल्या.
या संमेलन प्रसंगी कविना मार्गदर्शन करताना जेष्ठ कवि श्रीपत मोरे म्हणाले,’ आयुष्याच्या वळणावर मी मागे वळून पाहताना मला माझे वाईट काळातील दिवस आठवतात,भूतकाळाच्या दुखद आठवणी आठवूण मन विचलीत होते,जिथे दु:ख,गरीबी,व सामाजिक त्रास असतो,तिथेच कविता जन्माला येते.
यावेळी कविना प्रतिष्ठाण मार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
प्रतिष्ठाणचे लक्ष्मण शिवणेकर,जेष्ठ कवि श्रीपत मोरे,वसुंधरा शिवणेकर आदि मान्यवरांच्या उपस्थित कविसंमेलन रंगतदारपणे पार पडले.विजय म्हामुस्कर यांनी सूत्रसंचालन केले.