Home महत्वाची बातमी नारी रक्षा समितीच्या वतिने पोलीस विभागात मास्कचे वाटप…!

नारी रक्षा समितीच्या वतिने पोलीस विभागात मास्कचे वाटप…!

280
0

कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी उपक्रम….!!

यवतमाळ , दि.१७ :- मार्च रोजी नारी रक्षा समितीच्या वतिने पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत कोरोना वायरसपासुन बचाव व्हावा तसेच आरोग्य सुदृढ व निरोगी राहुन संपुर्ण जनतेचे रक्षण करावे यासाठी त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.यवतमाळात कोरोणा वायरसचे रुग्ण आढळुन आल्याने संपुर्ण जिल्हा हादरला असुन प्रशासन खडबडून जागे झाले यातच पोलीसांना वेळी अवेळी आपले कर्तव्य बजावावेच लागते मग तो सण असो ,

निवडणुक,मोर्चा,आंदोलने,गणेशोत्सव,नवरात्रौत्सव,नेत्याच्या सुरक्षेची हमी घेऊन सदैव नागरीकांच्या रक्षनार्थ तत्पर एवढेच काय तर आजच्या घडीला संपुर्ण देश कोरोना वायरसच्या विळख्यात असतांनाही अनेक ठिकाणी मास्कच्या तुटवड्यामुठे जिवाची पर्वा न करता पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपली ड्युटी बजावत आहे.

हातात काठी घेऊन कोरोना वायरसच्या दहशतीतही फिरताहेत , या करिता त्यांच्या आरोग्याची जाण लक्षात घेऊन तसेच सामाजिक दायित्वाचा जाणीव ठेवून नारी रक्षा समितीच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालय,वाहतुक पोलीस,अवधुतवाडी पोलीस स्टेशन व इतरत्र मास्क लावुन देत वाटप केले.कोरोना वायरस होणारा फैलाव रोखण्यासाठी जवळपास १०० महिला-पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले. मास्कचे वाटप करतांना विनोद दोंदल,सुकांत वंजारी , दुर्गा पटले , वर्षा चव्हाण , मंदा गुडदे , मनोज लुटे , शितल तेलंगे , मिरा फडणीस , समिना शेख , पुष्पा जाधव , अवंती चौधरी , मनिषा तिरणकर , काजलकिरण कांबळे,हर्षल राठोड,विजय शेंन्डे,विजय राऊत,योगेश धानोरकर , आशिष तुपटकर,प्रथमेश कांबळे आदी उपस्थित होते.

Previous articleजिथे दु:ख,गरीबी,सामाजिक त्रास असतो,तिथेच कविता जन्माला येते. जेष्ठ कवि श्रीपत मोरे. भारत कवितके,मुंबई
Next article७५वा दिवस धरणे आंदोलन अमृत निषेध दिन म्हणून साजरा तीन ठराव सम्मत-
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here