Home जळगाव ७५वा दिवस धरणे आंदोलन अमृत निषेध दिन म्हणून साजरा तीन ठराव सम्मत-

७५वा दिवस धरणे आंदोलन अमृत निषेध दिन म्हणून साजरा तीन ठराव सम्मत-

105
0

*९५ वर्षाचे सैयद मूसा व ८० वर्षीय अंध सैयद तफज्जुल ची उपस्थिति*

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीला विरोध म्हणून मंगळवारी ७५ वा दिवस हा जळगाव शहरातील पंच्याहत्तर वर्षा वरील पुरुष व महिलांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला.
या अमृत निषेध दिनात १७५ सिनियर सिटीझन चा समावेश होता सुरुवातीलाच या धरणे आंदोलना चे बोर्डाचे अनावरण अब्दुल हक अब्दुल नबी पटेल, अब्दुल हमीद शेख बक्ष ,
मजीद खान अकबर खान व अब्दुल रहमान शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
*धरणे आंदोलनाला सुरुवात* बोर्डाचे अनावरण केल्यावर माजी ग्रामसेवक ८० वर्षीय अब्दुल हमीद शेख यांनी पवित्र कुराण पठाणाने सुरुवात केली तर सांगता सुंनी पंथ चे शरीफ शहा यांनी केली या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सीनियर सिटिझन यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने अज़ीज़ ब्यावली, खलील देशमुख, माजी ऑपरेटर निसार शेख ,चोपड्याचे कम्युनिस्ट पार्टीचे अमृत महाजन, फातिमानगर चे मुफ़्ती रमिज़, जळगाव शहराचे प्रमुख मुफ़्ती अतीकुर्रहमान, काँग्रेस आईचे मुफ़्ती हारून नदवी, कविवर्य रागिब ब्यावली, राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार मलिक, डॉक्टर अमानुल्ला शाह, करीम सालार तर महिलांमध्ये तबस्सुम सुलताना, मुबाशिरा शेख मुख्तार तहेरिन शेख सादिक, मसेरा शेख शकिल, गजाला शेख जाकीर, मुनज़्ज़ा शेख सलीम ,सबा व सादिया कयूम, फरजाना खान तसेच हमजा पटेल यांनी आपले विचार मांडले
*तीन ठराव संमत*
वरिष्ठ सदस्यांनी खालील तीन ठराव सर्वसंमतीने पारित केले त्यात
पहिला ठराव इंडिया टीव्ही नेजो कार्यक्रम सादर केला व त्या कार्यक्रमामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रसारण केले त्याचा हे धरणे आंदोलन जाहीर निषेध करीत असून त्या चित्रफिती ची सविस्तर चौकशी होऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करीत आहे
ठराव क्रमांक दोन मुफ़्ती हारून नदवी, मुफ़्ती अशपाक कासमि व इतर सर्व महाराष्ट्रातील मुफ़्ती बाबतीत चे काही चुकीचे वक्तव्य केले जात आहे त्याचाही जाहीर निषेध करण्यात आला व जळगाव मुस्लिम मंच व संविधान बचाव नागरी कृती समिती या सर्व मौलवींच्या पाठीशी आहे असे सर्वसंमतीने ठरले
तीसरा ठराव जळगाव शहरातील कोणत्या हि वार्डातून एन पी आर ची माहिती दिली जाणार नाही तिचा आम्ही बायकोट करीत आहोत असे ठराव संमत झाले.
ठरावाचे वाचन फारुक शेख यांनी केले व उपस्थितांनी त्यास मंजुरी दिली.
*मृत आत्मयास श्रधांजलि*

जलगांव येथील हॉकर्स यूनियन चे बागवान मोहल्ला येथील मुन्ना बागवान यांच्या अल्पशा आजराने तर शानिपेठ येथील सर्वात व्यस्कर व फारूक आहेलेकार यांचे मोठे वडील अहेमद अहलेकर यांचे वृद्धाप कालाने मृत झाल्यावर त्यांना श्रधांजलि अर्पण करण्यात आले.

*अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन*
अमृत निषेध दिनानिमित्त दोन निवेदन देण्यात आले एक निवेदन महिलांच्या माध्यमाने त्यात आम्ही राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीला कोणतीही माहिती देणार नाही व आम्ही एनपीआर चा बायकोट करीत आहोत. दुसरे निवेदन पुरुष मंडळी ने दिले त्यात सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेण्यात यावा अथवा त्यात धर्माच्या आधारे दिलेली नागरिकत्व परत घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
सदरचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना देण्यात आले महिलांमध्ये नाजेरा शेख, फातिमा खान ,शहनाज खा न, शमीम खाटीक, शबनूर शेख, कुलसुनशेख ,खातून शेख, अरस्तुल शेख तर पुरुषांमध्ये शब्बीर खान अब्बास खान, अब्दुल हमीद शेख अमीर ,अजिज ब्यावली, मोहम्मद इकबाल हाजी सत्तार ,शब्बीर हमीद खान ,अब्दुल हमीद शेख बक्श, इकबाल हुसेन ,सय्यद जहूर अली ,मजीद खान व रागिब ब्यावली यांचा समावेश होता.

Previous articleनारी रक्षा समितीच्या वतिने पोलीस विभागात मास्कचे वाटप…!
Next articleभयंकर! 12 रुपये प्रती किलो दराने कोंबड्यांची विक्री, पोल्ट्री उद्योग कोलमडला
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here