Home महत्वाची बातमी भयंकर! 12 रुपये प्रती किलो दराने कोंबड्यांची विक्री, पोल्ट्री उद्योग कोलमडला

भयंकर! 12 रुपये प्रती किलो दराने कोंबड्यांची विक्री, पोल्ट्री उद्योग कोलमडला

63
0

राजेश भांगे

हिंगणा (जि.नागपूर): कोंबड्यांमुळे कोरोना होत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. या अफवेमुळे कोंबड्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. हिंगणा तालुक्‍यात पोल्ट्री व्यवसायिकांना जवळपास एक कोटी रुपयांचा फटका महिनाभरात बसला आहे. परिणामी पोल्ट्री व्यवसाय आता डबघाईस आला आहे.
हिंगणा तालुक्‍यात पोल्ट्री व्यवसाय बऱ्यापैकी विकसित झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नोंदणीनुसार तालुक्‍यात पोल्ट्री फार्मची नोंद करण्यात आली आहे. पाच हजाराच्या वर कोंबड्यांची क्षमता असलेल्या पोल्ट्री फार्मची नोंद केली जाते, हे विशेष. याव्यतिरिक्त पाचशे ते हजार नग ठेवणारे पोल्ट्री व्यावसायिक दहा ते बाराच्या घरात आहेत. नोंदणीकृत पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये कोंबड्यांच्या क्षमतेनुसार सिद्धी पोल्ट्रीफॉर्म बीड बोरगाव्‌ (१० हजार), न्यू कोहिनूर पोल्ट्री फार्म खडका (५५०० ), संघर्ष संघर्ष पोल्ट्री फार्म (९०००), कोहिनूर पोल्ट्री फार्म (७५००), अमर पोल्ट्री फार्म सुकळी (५०००), विष्णू पोल्ट्री फार्म आमगाव देवळी (१२०००), धीरज पोल्ट्री फार्म आमगाव( १२०००), अन्नपूर्णा पोल्ट्री फार्म वडगाव बक्षी (१३०००), कॉलिटी पोल्ट्री फार्म लाडगाव (५५००), न्यू केजीएन पोल्ट्री फार्म वडगाव गुजर (१०००), नाईस बॉयलर फॉर्म गुमगाव (१२०००), गौरी पोल्ट्री फॉर्म शिवमडका(९०००) यासह दाभा, कान्होलीबारा, जुनेवाणी येथेही पोल्ट्री फार्म कार्यरत आहे. याशिवाय जवळपास दहा पोल्ट्री फार्म पाचशे ते हजारच्या घरात क्षमता असलेले आहे.
*कर्ज काढून थाटला व्यवसाय*
महिनाभरापासून कोरोनाची अफवा सर्वत्र पसरली. सोशल मीडियावर कोंबड्या खाल्ल्यामुळे कोरोना होत असल्याची अफवा पसरवण्यात आली. यामुळे होळी सणाच्या पाडव्याला कोंबड्यांची विक्री ठप्प झाली. 85 रूपये किलो जाणारी ब्रायलर कोंबडी 12 रूपयाने दयावे लागत आहे. कोंबडयाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक करीत असताना विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणीकृत असलेले व इतर लहान क्षमता असलेले पोल्ट्री फार्मचे मिळून जवळ्पास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यवसाय करणारे अनेक शेतकरी बांधव आहेत. कर्ज काढून अनेकांनी पोल्ट्री व्यवसाय थाटला आहे. कोरोनामुळे संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय आता मोडकळीस आला आहे. अशा परिस्थितीत बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे.
*पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्या करावी काय?*
कोंबड्यावर कोरोना नसतानाही सोशल मीडियावरील अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्‍यात आला आहे. कोंबड्यांची विक्री पूर्णता ठप्प झाली आहे. बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाकडून अद्यापही मदतीसाठी कुठलाही निर्णय झाला नाही, आता पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्या करावी काय, असा संतप्त सवाल धीरज पोल्ट्री फार्म आमगावचे संचालक सिद्धार्थ फुलझेले यांनी उपस्थित केला आहे.
*पशुसंवर्धन मंत्री न्याय देणार का ?*
कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला आहे. विदर्भासह राज्यातील सर्व विभागातील पोल्ट्री व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत. विदभ पोल्ट्री असोसिएशनने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले. कोरोनामुळे कोट्यवधीचा फटका बसला आहे. यामुळे पशुसंवर्धन मंत्र्यांनी पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीची हात देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हिंगणा तालुक्‍यातील पोल्ट्री व्यवसायिकांनी केली आहे.

Unlimited Reseller Hosting