Home महत्वाची बातमी आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील ४४२ जण ठरले यशस्वी…!!

आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील ४४२ जण ठरले यशस्वी…!!

91

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.

राजेश भांगे

मुंबई – राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ करोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाइन आहे. त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
यवतमाळ येथे करोना बाधित आढळलेली २१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आयटी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण करोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
आज करोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण करोना बाधित आढळले असून इतर ७ जण करोना निगेटिव्ह आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील १ लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.