Home महत्वाची बातमी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

25
0

राजेश भांगे

मुंबई , दि. १७ :- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये ७ दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काल मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळाल्यावर प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता ७ दिवस सुट्टी मिळणार आहे.
राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईतची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहेत.
दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. तसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्य गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.

Unlimited Reseller Hosting