Home जळगाव शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीत अफवा पसरविणाऱ्यांवर...

शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीत अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

23
0

रावेर (शरीफ शेख)

कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 लागु करण्यात आला आहे. याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले होते.
परंतु या आदेशाच्या गैरअर्थ लावण्यात येऊन सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या संदेशामधून जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यानुसार सर्वांना कळविण्यात येते की, हा आदेश फक्त जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून यांनाच लागू आहेत. सर्व शॉपिंग मॉल वगळता इतर दुकाने व आसथापना बंद करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये म्हटले आहे.

Unlimited Reseller Hosting