Home जळगाव महिलेच्या चोरलेल्या पर्स व मुद्देमाला सह आरोपींना अटक

महिलेच्या चोरलेल्या पर्स व मुद्देमाला सह आरोपींना अटक

20
0

शरीफ शेख/ जळगाव

रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर पाच वर एक महिलाचा पर्स पर्स चोरी झाले होते त्यात 50 हजार रुपये असल्याची बातमी होती सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही अनोळखी महिला ट्रेन मधून उतरताना दिसले रेल्वे पोलिस यांनी तात्काळ ते फोटोज Midc पो.स्टे चे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी इम्रान सय्यद यांना मिळाल्यानंतर त्यांनी मेहरुन तलाव परिसरात बातमीची खात्री केली असता तिथे समजलं की काही उत्तर करू लोक मेहरून तलावाजवळ उतरले आहे त्यात दोन संशयित इसम एक महिला1) रंजना लक्ष्मन पवार वय27 व2) धोंडाराम लक्ष्‍मण भोसले वय 21 दोन्ही रा, मेहरुन तलाव परिसर जळगाव संशयित आरोपी यांना विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 72000 हजार रोख रक्कम व सोन्याचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र मिळून आले पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान सय्यद व रेल्वे आरपीएफ कर्मचारी रेहान शेख , विजया जाधव अशांनी वरील आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला सदर आरोपी यांनी मंगळसूत्र हे भुसावळ रेल्वे स्टेशन येथून चोरले होते अशी कबुली दिलेली आहे पुढील तपास कामी आरोपी यांना लोहमार्ग पोलीस भुसावल रेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.