Home महत्वाची बातमी अन ती झाली बुलडाणा जिल्ह्याची एक दिवसाची कलेक्टर ???

अन ती झाली बुलडाणा जिल्ह्याची एक दिवसाची कलेक्टर ???

60
0

अमिन शहा

बुलडाणा , दि. ०२ :- जागतिक महिला दिन हा महिलांनी त्यांच्या अधिकारासाठी केलेला संघर्ष आणि दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपले आयुष्य क्षणोक्षणी समाजाच्या विकासासाठी झोकून दिले आहे. त्यांचं स्मरण करून त्यांच्या पायवाटी चालणे आपले कर्तव्य आहे. याच दिशेने जिल्हाधिकारी सूमन चंद्रा यांनी एक पाऊल टाकले आहे. २ मार्चला आठवी इयत्तेतील टॉपर पूनम देशमूखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला. हा सांकेतिक प्रभार तिला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवले आणि पूनमने दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांची ऐट अनुभवत मुलींच्या शिक्षणासाठी झटण्याचा मनोदय व्यक्त केला.

८ मार्चला जागतिक महिला दिन आहे. या पृष्ठभूमीवर देशभरात महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम साजरे करणे सुरु झाले आहे. मात्र कार्यक्रमाची आठवण रहावी प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा नवनवे प्रयोग राबवित असतात. त्यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत २ ते ८ मार्च दरम्यान महिला सप्ताह राबविण्याचे ठरवीले. त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त ७ दिवस विद्यार्थींनींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी यांचा सांकेतिक प्रभार सोपविणार आहेत. आज २ मार्चला बुलडाणा जवळच्या पाडळी गावातील पूनम देशमूखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान मिळविला. तिला पूनमला प्रशासकीय सेवेत यायचे आहे. तिला खूप शिकून कलेक्टर होण्याची तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे यावेळी जिल्हाधिकारी सूमन चंद्रा यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहिरे, डॉ.आर.जी.फटी, निलेश तायडे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.