Home मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसला सोडचिठी देत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये लोकहिताचे...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसला सोडचिठी देत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये लोकहिताचे कार्य करणार – सुरेश वाघमारे

46
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. ०२ :- शेतकरी कष्टकरी अपंग दिव्यांग,निराधार,अबला दीनदुबळ्यांचे कैवारी कधीही केव्हाही कुठेही गोरगरिबांमध्ये मिसळून त्याना आधार देणारे वेळप्रसंगी अधिकाऱ-यांच्या कानशिलात लगावणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आक्रमक कार्यपद्धतीला आकर्षित होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस मालाडचे तालुका अध्यक्ष .युवानेते सुरेश वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठी देण्याचे ठरविले आहे; वाघमारे यांच्याकडे युवकांची मोठी फौज असून आंबेडकरी चळवळीतील जनांदोलनामुळे वाघमारे यांचा आक्रमक चेहरा सर्वश्रुत आहे .सुरेश वाघमारे यांनी रिपब्लिकन सेने चे चार वर्ष जिल्हा अध्यक्ष पद भूषविले असताना त्यांचा प्रशासनावर नेहमीच चांगल्या कामामुळे आंदोलनामुळे वचक राहिला आहे .उत्तरमुंबई जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संघटनेत वाघमारे विविध पदावर कार्यरत असून अन्याय अत्याचार होत असलेल्या ठिकाणी कुठलाही पक्ष पात न करता हिरीरीने सहभाग घेत पुढे धजावत असतात विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं योगदान असून पत्रकारांसाठी मोठे आंदोलन उभारणार असल्याचे वाघमारे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले .

प्रहारच्या माध्यमातून जनसामान्यचे प्रश्न बच्चूभाऊ च्या नेतृत्वात सोडविणार असून लवकरच आपण आपल्या समर्थकांसह राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन लवकरच जाहीर प्रवेश करणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे .

Unlimited Reseller Hosting