Home जळगाव मुस्लिम मंच च्या ६१ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच

मुस्लिम मंच च्या ६१ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच

15
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंचच्या माध्यमाने सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा शनिवार ६१ वा दिवस या दिवशी जळगाव शहरातील जागृक नागरिक कृती समितीने सक्रिय सहभाग नोंदविला व भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ चा विरोध तर एक मे पासून होणाऱ्या एन पी आर ला वीरोध म्हणून आपला निषेध नोंदविला.

शनिवार धरणे आंदोलनाची सुरुवात जळगाव येथील हाफिज अकील खान यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर दुवा तांबापुर येथील सुन्नी मस्जिद चे विश्वस्त शरीफ शाह यांच्या दुवाने करण्यात आली.

६१ व्या दिवशी धरणे आंदोलनात फारुक शेख शरीफ क्युमस्तर अल्ताफ शेख रियाज बागवान व व लहान मुली मरियम ऑफिस अब्दुल रहीम व सायमा या दोघी भगिनींनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले

*६१ व्या दिवसापर्यंत रोज यांची असते उपस्थिती*

फारुक शेख, अल्ताफ शेख, अल्ताफ मणियार, उस्मान बिलाल, फारुख अहिलेकार,शरीफ शाह, करीम सालार, हारून मुफ़्ती,गफ्फार मालिक, सय्यद नूर सय्यद कादर, अनवर सिकलीगर,अज़ीज़ सिकलीगर,शाहिद सय्यद, जैनुद्दीन शेख, अकील खान मणियार, मुजाहिद खान, तय्यब शेख ,हाफिज अब्दुल रहीम, मोहसिन शिकलकर,सलीम इंडिया रेडिएटर, असलम पठाण, अब्रार खाटीक सय्यद सलीम, शफी खाटीक, हमीद जनाब, शेख रफीक, रशीद कासमी, अफजल पठाण, तसेच स्वच्छता करणारे श्री आरिफ शेख शिवाजीनगर, मंडप ची सेवा देणारे अनिस पिंजारी ,साऊंड सिस्टिम ची सेवा देणारे रफिक शेख टायपिंग ची सेवा देणारे वाणी, रोज आंदोलकांना पाणी पाजणारे फारूक पटेल या सर्वांची सतत सेवा मिळत असल्याने मंच समन्वयक फारुक शेख यांनी सर्वांचे ऋणात राहून आभार व्यक्त केले.
शनिवारी शासकीय पाच दिवसाचा आठवड्याची सुरुवात असल्याने आज शासकीय कार्यालय बंद होती त्यामुळे निवेदन देता आले नाही.