Home विदर्भ महामानवाच्या जंयत्या नाचून नव्हे तर वाचुन साज-या व्हाव्या – प्रबोधनकार. प्रविणदादा देशमुख

महामानवाच्या जंयत्या नाचून नव्हे तर वाचुन साज-या व्हाव्या – प्रबोधनकार. प्रविणदादा देशमुख

66
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा ज्या महामानवांनी समाजासाठी आयुष्य वेचले अशा महामानवांच्या जयंत्या नाचून नव्हे तर त्या वाचून साज-या व्हायला पाहिजे. ज्या दिवशी आमच्या जनुकांमध्ये महामानव येथील त्यादिवशी आमच्या घरांचे वाशे फिरलेले असतील,परिवर्तन झालेले असेल असे प्रतिपादन शिवजयंती महोत्सवानिमित्त शिव व्याख्याते प्रवीणदादा देशमुख यांनी दहेगाव (गोंडी) ग्रामस्थांना शिवरायांचा इतिहास सांगताना मांडले.

ते पुढे म्हणाले की, आमच्या मुलांचे खऱ्या अर्थाने मेंदू घडवण्यापेक्षा मेंदू बधीर करणारे वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून टीव्ही सिरीयलमध्ये महामानवाचे इतिहास सांगण्या येवजी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बुवा, बावा आणि अम्मा यानी टिव्ही सारख्या माध्यमातून आमचे मेंदू बधिर केले आहे आणि अलीकडे मोबाईल सारख्या माध्यमातुन आमची तरुण पिढी पब्जी सारख्या व्हिडिओ गेममध्ये अडकली आहे आमच्या तरुण पिढीला भावी कलेक्टर ,आय.पी.एस.अधिकारी करायचे असेल तर शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले,भिमाई, रमाई यांच्या कर्तुत्वाचा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे आणि तो नुसता सांगूनच होणार नाही तर तो डोक्यात जेवून आचरणात आणावा लागेल तरच आमची नविन पिढी घडेल असे प्रतिपादन प्रवीण दादा देशमुख यांनी जनप्रबोधनामध्ये केले.

शिवजयंतीनिमित्त दहेगाव (गोंडी) येथे गेल्या पाच वर्षापासून शिवशक्ती मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. याहीवर्षी ही शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 25 फेब्रुवारी 2020 ला ग्रामपंचायत मैदानामध्ये सायकाळी शिवचरित्राचा इतिहास लोकांना कळावा म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते प्रवीणदादा पाटील यांचे प्रबोधन व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच सौ. प्रीतीताई श्रीराम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विशालभाऊ चौधरी, सुरज खोबरागडे सचिन मनोहर संभाजी ब्रिगेड यवतमाळ, राजेश भोयर सर, डाॅ.चैताली चोडेकर यांची प्रमुख पाहुण्याने म्हणुन विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महामानवाच्या फोटोना वंदन करण्यात आले. तसेच खरांगणा येथील देशासाठी सीमेवर लढणारे वीर जवान भूषण दांडेकर यांचे दिनांक 22 फेब्रुवारी 2020 ला सीमेवर शहीद झाले त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. सकाळी ढोल ताशाच्या गजरामध्ये रॅलीचेआयोजन तर सायंकाळी जनप्रबोधन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमासाठी शिवशक्ती मिञ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन अविनाश वागधरे, प्रास्ताविक शुभम मांडगांवकर व आभार मारोती चवरे यांनी मानले.