Home विदर्भ पतीच्या हत्येची सुपारी देऊन पत्नीने केलि हत्या

पतीच्या हत्येची सुपारी देऊन पत्नीने केलि हत्या

291

प्रियकर व पत्नी अटक

अमीन शाह

अमरावती , दि. २२ :- धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील ४० वर्षीय इसमाचा मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत गुरूवार २० फेब्रुवारी रोजी आढळला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी २४ तासात मृतकाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.
हनुमंत साखरकर यांच्या हत्येचा कट पत्नी व तिच्या प्रियकराने रचून ५० हजारांची सुपारी देऊन ही हत्या करून घेतल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी पोलिस तपासात समोर आली आहे.
हनुमंत साखरकर (४०) रा.मंगरूळ दस्तगीर असे मृतकाचे तर अनुराधा हनुमंत साखरकर आणि उमेश प्रल्हाद सावळकर (३६) दोघेही रा.मंगरूळ दस्तगीर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हनुमंत साखरकर हे १४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते, अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात दाखल केली होती. त्याचा शोध सुरू असताना गुरूवारी विटाळा येथील नदीपात्रात हनुमंत याचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान त्याचा गळा आवळून खून केल्याची प्रथमदर्शनीच समोर आले. शवविच्छेदनानुसार हा खून असल् याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांनी गुरूवारी रात्री अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. व पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान मृतकाची पत्नी अनुराधा व गावातीलच व्यावसायीक उमेश सावळकर यांच्यात मागील काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी आंतरीक माहिती घेतली असता अनुराधा आणि उमेश दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सत्य घटना समोर आली. या हत्या प्रकरणातील सुपारी घेवून हत्या करणारे आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळ बाबत संभ्रम कायम
एकीकडे मंगरूळ दस्तगीर येथील प्रकरणात पोलिसांनी अनुराधा साखरकर व उमेश सावळीर यांना अटक केली असली, तरी घटनास्थळ नेमके कोणते या बाबत संभ्रम कायम असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळते. उमेशच्या म्हणण्यानुसार निंबोली रोडनजीक सुपारी घेणार्‍यांनी हनुमंत साखरकर याचा खून केला. दरम्यान पोलिस तपासात हनुमंत साखरकर यांच्या घराची पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूस असलेल्या झेंडूच्या झाडांमध्ये एक काळ्या रंगाचा बो व बांगड्या आढळल्या आहे, तर झेंडूची झाडेसुद्धा काही ठिकाणी कुस्करल्या गेल्याची चिन्हे मिळाली आहेत. तसेच घरामध्ये वीस-पंचवीस वापरलेले कंडोमसुद्धा आढळून आले आहेत. आरोपी सध्या घटना दुसरीकडे झाल्याचे सांगत असले तरी घरामागील झेंडूची झाडे कूस्करले कोणी, तिथे बो व बांगड्या आल्या कशा आणि घरामध्ये इतके वापरलेले कंडोम कसे. इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहे. तिसरा आरोपी अटक झाल्यानंतर या बाबतीत खुलासेवार माहिती पुढे येईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे

सुपारी घेऊन खून करणारा तिसरा आरोपी आपले काम फत्ते करून पचमडीकडे महाशिवरात्री साजरी करण्यात गेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान नेमके आरोपी किती याबाबत अजूनही निश्चित व्हायचे असून आरोपींची संख्या वाढू शकते, असे कायदेशीर सूत्रांकडून कळते.